Press "Enter" to skip to content

कोकण दर्पण इम्पॅक्ट ! ओवे कॅम्प मध्ये नवीन जलवाहिनी बसविण्याचे काम सुरु !

पनवेल : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर जवळील ओवे कॅम्पमधील पाण्याचा प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून येथे नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे येथील पाणी समस्या काही प्रमाणात सुटणार आहे.
१९६० साली कोयना धरणग्रस्त झालेल्या नागरिकांचे शासनाने येथे पुनर्वसन केले आहे. मात्र, मागील ६० वर्षांपासून नागरीसुविधांसाठी येथील नागरिकांचा संघर्ष सुरु आहे. गावामध्ये सुमारे ३ हजार लोकवस्ती आहे. मात्र, कमी व्यासाच्या जलवाहिनीमुळे पाणी कमी दाबाने अथवा मिळत नसल्याच्या वारंवार तक्रारी नागरिक करीत होते. येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादीचे ओवे कॅम्प अध्यक्ष अरविंद जाधव यांच्या नेतृत्वाखाली जनता रस्त्यावर उतरली. येथील पण प्रश्नाचे थेट वृत्तप्रसारण कोकण दर्पण कोकण लाइव्हने प्रसारित करीत प्रशासनाचा पर्दाफाश केला होता. कोकण दर्पण कोकण लाईव्ह वृत्ताची दखल घेत पनवेल महानगरपालिका प्रशासनाने घेत मोठ्या व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु केले आहे.

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »