नवी मुंबई : अखेर सीबीडी येथील राजीव गांधी स्टेडियम खेळण्यासाठी खुले करण्यात आले आहे. स्थानिक नगरसेविका स्वाती गुरखे यांनी याबाबत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांना लेखी निवेदन दिले होते.
लॉकडाउन काळात सदर स्टेडियम बंद करण्यात आले होते. अनलॉकमध्ये पालिका प्रशासनाने मॉर्निंग वॉक आणि शूटिंगसाठी केले. मात्र, स्थानिक खेळाडूंना तिथे खेळाचा सर्व करता येत नव्हता. सदर स्टेडियम खेळाडूंसाठी सुरु करावे, अशी मागणी करीत नगरसेविका स्वाती गुरखे यांनी आयुक्तांना लेखी निवेदन दिले. अखेर स्वाती गुरखे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. नवी मुंबई मनपा प्रशासनाने सदर स्टेडियम खेळासाठी सुरु केले आहे.
राजीव गांधी स्टेडियम खेळण्यासाठी खुले ! नगरसेविका स्वाती गुरखे यांच्या पाठपुराव्याला यश !
More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
More from RaigadMore posts in Raigad »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »
More from ThaneMore posts in Thane »