Press "Enter" to skip to content

पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना दीपावलीसानुग्रह अनुदान द्यावे : विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे !

पनवेल : २०२१ च्या दीपावली सणानिमित्त पालिका अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना सानुग्रह अनुदान मिळावे आणि सर्वसाधारण सभेत प्रस्ताव सादर करावा अशी मागणी पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पालिकेचे आयुक्त यांच्याकडे केली आहे.

लोक दिवाळी दरवर्षी साजरी करतात, भारताच्या सर्व सणांतील हा सण लोकांना आनंदाने,उत्साहाने भरपूर करतो. दीपावलीचे चार दिवस हा आनंद दुथडी भरून वाहतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालिकेत काम करणारे सर्व कर्मचारी वर्गास दीपावली सण गोड व्हावा याकरता सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय पुढील सर्वसाधारण सभेत प्रस्ताव सादर करून घेण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे, प्रीती जॉर्ज, नगरसेविका डॉ डॉक्टर सुरेखा मोहोकर, सारिका भगत यांनी केली आहे.
More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »