Press "Enter" to skip to content

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७० वा वाढदिवस ! भाजयुमो उत्तर रायगड जिल्ह्याच्यावतीने रक्तदान व प्लाझ्मा दान शिबीर !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्यावतीने १७ सप्टेंबर रोजी रक्तदान व प्लाझ्मा दान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
कोरोना महासाथीचा मुकाबला करताना ‘संगठन ही सेवा’ या उपक्रमांतर्गत विविध सेवाकार्य पक्षाचे कार्यकर्ते राज्यभर करत आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर रायगड जिल्हा, पनवेल तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा सप्ताह, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती व राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम कोरोना संबंधित सर्व नियमांचे पालन करून आयोजित करण्यात येणार आहेत.
या उपक्रमातील सेवासप्ताह अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्यावतीने खारघरमधील श्री. रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड स्कुल येथे आणि भारतीय जनता पार्टी व आमदार महेश बालदी जनसंपर्क मोहोपाडा कार्यालय येथे रक्तदान आणि प्लाझ्मा दान शिबीर होणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी अमर ठाकूर (८७६७१७१०१०), दिनेश खानावकर (९८९२४४५२५२), शेखर तांडेल (९८३३५४५७७७) किंवा चिन्मय समेळ (८७६७१४९२०३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण दर्पण.

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »