Press "Enter" to skip to content

पनवेल मनपा कार्यक्षेत्रात रविवारी पल्स पोलिओ मोहिम ! ०-५ वयोगटातील बालकांना होणार पोलिओ लसीकरण !

पनवेल : पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात रविवार,दिनांक २६ सप्टेंबरला ० -५ वयोगटातील बालकांसाठी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमे अंतर्गत ० -५ वयोगटातील बालकांना सकाळी ९ .०० ते ५ .०० या वेळेत लसीकरण केले जाणार आहे. या मोहिमेसाठी पोलिओ लसीकरण टिम सज्ज झाली आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील रेल्वे स्टेशन्स, बस स्थानके , सहा नागरी आरोग्य केंद्र, तसेच शहरात ठिकठिकाणी पोलिओ लसीकरण केंद्र उभारले जाणार आहेत. पनवेल कार्यक्षेत्रात एकुण ३२६ पोलिओ लसीकरण केंद्रावरती बालकांचे लसीकरण केले जाणार आहे. याबरोबरच झोपडपट्टी, बांधकाम क्षेत्रे अशा भागातील बालकांच्या लसीकरणासाठी ४१ मोबाईल टिम कार्यरत असणार आहेत तसेच २४ ट्राझिट टिम असणार आहेत.

“पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात पोलिओ लसीकरणासाठी ६६ हजार ५८५ बालकांचे लक्ष असणार आहे. पालकांनी कोविड नियमांचे पालन करून आपल्या बालकांना लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आयुकत गणेश देशमुख यांनी केले आहे.

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »