पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सिंगल यूज़ प्लास्टिक मुक्ती संकल्प अभियान राबविण्यात आले. जिल्हा सह-प्रमुख गीता चौधरी, खारघर तळोजा मंडळ सह-प्रमुख बिना गोगरी यांच्या सहकाऱ्याने व नगरसेविका हर्षदा अमर उपाध्याय यांच्या पुढाकाराने व कार्यक्रमाच्या संयोजिका खारघर तळोजा मंडळ महिला मोर्चा चिटणीस मधुमिता जेना व सहसंयोजक सौ श्यामला सुरेश यांनी सेक्टर १२ भाजी मार्केट मध्ये सिंगल यूज़ प्लास्टिक मुक्ती संकल्प अभियान उपक्रम राबविला. या मोहिमे अंतर्गत लोकांना प्लास्टिक बंदीचे महत्त्व पटवून देण्यात आले. कापडी पिशव्या वाटप करून लोकांना घराबाहेर निघताना कापडी पिशवी घेऊनच निघण्याचे आवाहन करण्यात आले. कापडी पिशवी घेऊन आलेल्या लोकांचे गुलाबाचे फूल देऊन कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिका गरसेविका हर्षदा अमर उपाध्याय, उत्तर रायगड जिल्ला चिटणीस सौ गीता चौधरी , खारघर तळोजा मंडळ शहर उपाध्यक्ष सौ निशा सिंह, सौ सीमा खडसे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोकण दर्पण.