मुंबई : ‘आंबेडकरी चळवळीचा अजेंडा काय ?’ या विषयावर मुंबई मराठी पत्रकार संघात तब्बल साडे तीन तासांची चिंतनपर एक विचार प्रवर्तक बैठक शनिवारी पार पडली. आंबेडकरी संग्रामने आयोजित केलेल्या या बैठकीत ३५ विशेष निमंत्रितांनी विचारांचे आदान प्रदान केले.
त्यात शिक्षणतज्ञ प्रा डॉ जी के डोंगरगावकर, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, साहित्यिक प्रा डॉ विठ्ठल शिंदे, ज्येष्ठ पँथर- रिपब्लिकन नेते सयाजी वाघमारे, राजकीय विश्लेषक सुनील कदम, आंबेडकरी संग्रामचे उपाध्यक्ष सतीश डोंगरे, बँक कर्मचारी नेते भाई पंजाबराव बडगे, बुद्धिस्ट – शेड्यूल्ड कास्ट मिशनचे संयोजक अच्युत भोईटे, बँक ऑफ बरोडाच्या एस सी/ एस टी एम्प्लॉईज असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र निकाळे, परिवहन विभागातील कर्मचारी नेते सुरेंद्र सरतापे, प्रा. एस डी ओव्हाळ, जनता दलाचे
राज्य सरचिटणीस रवी भिलाने, गौतम सोनावणे,सीताराम लव्हांडे, रुग्ण हक्क परिषदेचे मुंबई अध्यक्ष सुनील शेजवळ, पत्रकार तानाजी कांबळे आदींचा समावेश होता.
येत्या २६ नोव्हेंबर २१ रोजी साजऱ्या होणाऱ्या संविधान दिनानिमित्त या चिंतन बैठकीत ‘संविधानवादी भारत’ या नव्या एल्गाराचे सूतोवाच करण्यात आले. ‘लोकशाही वाचवा, राष्ट्र जगवा’ हे आमचे ब्रीद वाक्य राहील, असे दिवाकर शेजवळ यांनी यावेळी जाहीर केले.
संविधानवादी भारत : नव्या एल्गाराचे सूतोवाच ! लोकशाही वाचवा, राष्ट्र जगवा!
More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
More from RaigadMore posts in Raigad »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »
More from ThaneMore posts in Thane »