राम भोस्तेकर / माणगाव : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सन २०२१-२२ अंतर्गत १ कोटी ६० लाख अंदाजित रक्कमेच्या दाखणे खर्डी नळपाणी योजनेचे भूमीपूजन कार्यक्रम १२ डिसेंबर रोजी महाड पोलादपूर माणगांव विधानसभेचे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते दाखणे व खर्डी बुद्रुक येथे पार पडला. या कार्यक्रमाला आमदार गोगावले यांच्या समवेत जिल्हाप्रमुख अनिल नवगणे,माजी जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, तालुका गजानन अधिकारी, माजी सभापती सुजित शिंदे शिवसेना नेते ऍड राजीव साबळे यांच्या सह शिवसेनेचे सर्व जेष्ठ कार्यकर्ते व मुंबईकर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी दाखणे ग्रामपंचायत हद्दीतील खर्डी बुद्रुक येथील झालेल्या जाहीर सभेत दाखणे गांवातील पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या उदघाटनाच्या २ पाट्या चा मुद्दा उपस्थित करत “आम्ही दुसऱ्याच्या बापाला आमचा बाप म्हणत नाही” आम्ही स्वतः प्रयत्न करून आणलेल्या विकासकामांची भूमीपूजने आणि उदघाटने करतो.दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेत नाही .असा मार्मिक टोला लगावत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.याच वेळी दाखणे ग्रामपंचायत मधील राष्ट्रवादी च्या सदस्या संस्कृती शिर्के यांच्यासह ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या चव्हाणवाडी गावातील शेकडो ग्रामस्थांनी सरपंच विश्वास उभारे यांच्या व आमदार भरतशेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याच वेळी गोगावले बोलताना म्हणाले की, विश्वास उभारे सारखा कार्यक्षम सरपंच तुमच्या ग्रामपंचायतला मिळाला हे सर्व ग्रामस्थांचे भाग्य आहे असे सांगत दाखणे ग्रामपंचायत हद्दीत कोट्यावधी रुपयांची विकासकामे करणाऱ्या सरपंच विश्वास उभारे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

आम्ही दुसऱ्याच्या बापाला आपला बाप म्हणत नाही ! आमदार भरतशेठ गोगावले गरजले !
More from KokanMore posts in Kokan »
More from RaigadMore posts in Raigad »




