मंडणगड : पुणे जिल्ह्यातील भारतरत्न मित्र मंडळ दिघी येथील बौद्ध उपासक, उपसिकांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोकण रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात असलेल्या आंबडवे या मूळ गावी भेट दिली.
संस्थेच्या पन्नास सभासद उपासक तथा उपासिका समवेत ५ ते ७ नोव्हेंबर दरम्यान दोन दिवसीय सहलीचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव अंबाडवे दापोली कोकण आणि मातारमाई यांचे माहेर वनंद दापोली कोकण या दोन्ही स्मारकाला भेट देवून सामूहिक वंदना प्रवचन घेण्यात आले. त्याच बरोबर कोकणातील निसर्ग रम्य वातावरणातील आनंद लुटत मरुड बीचचा आनंद घेण्यात आला. या मध्ये सम्यक कल्याण संघाचे सर्व संचालक राजेंद्र राऊत महेंद्र मनवर ,महेंद्र अवचार, श्रीकृष्ण मोरे व इतर सभासद आणि रमाई महिला मंडळाच्या उपासिका सहभागी होत्या. ज्याने जगाला बुद्ध दाखविला असे आमचे प्रेरणास्थान डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची सावली म्हणून सात देणारी माता रमाई या दोन्ही महामानवाच्या मूळ गावी जावून स्मारकात नतमस्तक झालो, अशा प्रकारचे सहलीचे नियोजन करण्यात आले होते, अशी माहिती संयोजक तथा पत्रकार राजेंद्र राऊत यांनी कोकण दर्पणशी बोलताना दिली.