पनवेल : पनवेल शहर जिल्हा महाविकास आघाडीचे नेते तथा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली व महाकाली चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने कोविड काळामध्ये आप आपल्या विभागामध्ये देशासाठी, राज्यासाठी व समाजासाठी एक कर्त्यव्यनिष्ठ राहून आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेततेसाठी अहोरात्र केलेल्या कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खारघर शहर महिला अध्यक्षा राजश्री कदम यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. खारघर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात शिवसेना महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, खारघर उपशहर प्रमुख प्रकाश गायकवाड, शिवसेनेचे रमेश वर्तक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या महिला शहर अध्यक्षा राजश्री कदम यांना कोविड योद्धा पुरस्कार !
More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
More from RaigadMore posts in Raigad »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »
More from ThaneMore posts in Thane »