चंद्रयान-३ ! भारतीय असल्याचा अभिमान !
राज सिकदेर, सल्लागार AIIITS
नवी, मुंबई : चंद्रयान-3ने चंद्राच्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं आहे. असं करणारा भारत जगातला पहिलाच देश ठरला आहे. आतापर्यंत कुणालाही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करण्यात यश आलेलं नाही. आतापर्यंत जगातल्या फक्त 4 देशांना चंद्रावर लँडिंग करण्यात आलं आहे. आपल्या शास्त्रद्यांनी देशाला दिलेला मोठा गौरव आहे, त्यामुळे भारतीय असल्याचा मला सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटेड टेकनिकल स्टडीजचे सल्लागार राज सिकदेर यांनी खारघर येथे काढले. चंद्रयान-३च्या यशस्वी यशस्वी लँडिंग नंतर AIIITS संस्थेच्या वतीने खारघर व वाशी येथील केंद्रांवर जल्लोष साजरा करण्यात आला.
Be First to Comment