पनवेल : पनवेल महानगरपालिकेतील खारघर प्रभाग ६ मधील धडाडीचे कार्यसम्राट नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण खारघरवासियांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. विशेष म्हणजे नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी त्यांचा वाढदिवस जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांसमवेत साजरा केला. वाढदिवसानिमीत्ताने निलेश बाविस्कर यांनी आपल्या नगरसेवक निधीतून नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस लोकार्पण केले. खारघर सेक्टर ३६ स्वप्नपूर्ती, खारघर सेक्टर १८, २२, २१ आणि खारघर प्रभाग क्रमांक ६ मधील वास्तुविहार , सेलिब्रेशन, घरकुल, स्पेगेटी मधील रहिवाशांनी नगरसेवक निलेश बाविस्कर यांचे जोरदार स्वागत करून वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. खारघर सेक्टर १५ मधील व्यापाऱ्यांनी नगरसेवक निलेश बाविस्कर यांचा वाढदिवस धुमधाक्यात साजरा केला.
जनतेचा नगरसेवक, जनतेचा नेता !
मागील पाच वर्षांच्या कारकिर्दीत नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी धडाकेबाज कामगिरी करून लोकांच्या मतात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे निलेश बाविस्कर म्हणजे जनतेचा नगरसेवक, जनतेचा सच्चा नेता असे बोलले जाते. प्रभाग क्रमांक रस्ते, उद्यान, गार्डन, दिवाबत्ती, तलाव आदींच्या कामासाठी सदैव प्रशासनाचा पाठपुरावा करून ते सोडविण्यात निलेश बाविस्कर यांनी सदैव पुढाकार घेतला आहे.
२४ तास जनतेसाठी धावणारा लोकप्रतिनिधी !
प्रभागातील जनतेने कधीही फोन केला तरी सदैव त्यांच्यासाठी धावणारा सच्चा लोकप्रतिनिधी म्हणून निलेश बाविस्कर यांचा नावलौकिक आहे. कोरोनाच्या काळात त्याची प्रचिती जनतेला आली. कोविड काळात प्रत्येकाचा जीव धोक्यात होता. कोणी कोणाला मदतीला जाताना शंभर वेळा विचार करीत होता. वैश्विक महामारीचा धोकाच तसा होता. मात्र, अशा गंभीर परिस्थितीत देखील निलेश बाविस्कर जनतेसाठी २४ तास उपलब्ध होते. रुग्णवाहिका असेल किव्हा रुग्णालयाची समस्या असेल निलेश बाविस्कर एक योद्धा म्हणून जनतेच्या पाठीशी उभे राहिले.
पुन्हा, निलेश बाविस्कर आमचे नगरसेवक हवेत !
वाढदिवसानिमित्ताने अनेकांनी वेगवेगळ्या शुभेच्या दिल्या. विशेषतः जेष्ठ नागरिक, व्यापारी आणि महिला वर्गाकडून निलेश बाविस्कर यांना विशेष शुभेच्छा मिळाल्या. पुढच्यावेळी पुन्हा निलेश बाविस्कर हेच आमचे नगरसेवक हवेत, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, अशा शुभेच्छा दिल्या.