पनवेल : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आघाडी सरकारची भूमिका राज्याला भूषणावह नाही. या सरकारने फक्त स्वार्थी आणि निष्क्रिय कारभार केला आहे त्यामुळे एसटी कर्मचार्यांसह प्रवाशांचे नाहक हाल करण्याचे काम महा विकास आघाडी सरकारने सुरू ठेवत आपली मनमानी केली आहे, त्यामुळे महा विकास आघाडी ही मनमानी आघाडी सरकार आहे अशी टीका भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ट्विटरवर ट्वीटद्वारे केली आहे.
महात्मा जी गांधी के तीन बंदर या युक्तीत वाईट बघू नका, वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका असे आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये उलट आहे. हे सरकार राज्यातील प्रश्नांबाबत काही बघत नाही, ऐकत नाही, बोलत नाही ही भूमिका अत्यंत चुकीची असून पुरोगामी महाराष्ट्राला शोभनीय नाही. एसटी कर्मचा-यांचे कष्ट हे खूप मोठ्या प्रमाणात असते, कर्मचारी म्हणून ते काम करीत असताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत त्यांना न्याय मिळेल अपेक्षित असताना महा विकास आघाडी जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करीत आहे.
ठाकरे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले. त्याचप्रमाणे एसटी कर्मचारी आणि प्रवाशांच्या बाबतीतही तेच घडले आहे. ठाकरे सरकारच्या निष्क्रिय कारभामुळे सर्व जनता चिंतीत झाली आहे. या काळात एसटी कमर्चारी आत्महत्या करू लागला आहे आणि त्याच्या कुटुंबाचा मोठा आधार हरपला जात असताना राज्य सरकार मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे राज्यातील समस्यांबाबत काही बघायचे नाही, ऐकायचे नाही व त्यावर काही बोलायचे नाही आणि या सर्वातून राज्यातील जनतेचे प्रश्न रेंगाळत ठेवायचे, फक्त सत्ता आणि सत्ता ही कर्मनीती महाविकास आघाडीची असून या तिघाडी सरकारचा निषेध करू तेवढा कमी आहे असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले आहे.
महाविकास आघाडी मनमानी आघाडी सरकार !
More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
More from RaigadMore posts in Raigad »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »
More from ThaneMore posts in Thane »