लायन्स क्लब सिबिडी – नवी मुंबईच्या वतीने खारपाडा येथे आदिवासी बांधवांना मोफत अन्न धान्य वाटप ! मोफत आरोग्य तपासणी शिबीर !
पनवेल, प्रतिनिधी :
सेवा सप्ताह अंतर्गत लायन्स क्लब सिबिडीच्या वतीने पेण तालुक्यातील खारपाडा गावातील मोरेश्वर भगत सार्वजनिक ग्रंथालयाच्या प्रांगणात मोफत आरोग्य शिबीर आणि आदिवासी कुटुंबासाठी मोफत अन्न-धान्य वाटप करण्यात आले. सदर शिबिराचा अनेक ग्रामस्थ नागरिकांनी लाभ घेतला.
यावेळी सिबिडी नवी मुंबई लायन्स क्लबच्या अध्यक्षा पूनम वालेचा, सचिव दिपा मौर्य, खजिनदार अलका अग्रवाल, लायन्स अंशू पॉल यांच्या विशेष पुढाकारातून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी लायन्स संजीव सूर्यवंशी, लायन्स मुकेश तनेजा, लायन्स मिलिंद पाटील, लायन्स नमिता मिश्रा,लायन्स जयलाल मान, लायन्स सत्यपाल चुग आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच लायन्स बिलकीस सुलताना, लायन्स हेमंत लोणकर, लायन्स दत्तात्रय कोळी, लायन्स उमेश, मोरेश्वर भगत सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष दयानंद भगत, उपाध्यक्ष कैलाश रुठे, सरपंच रश्मी भगत, उप सरपंच मछिंद्र सवार, चिल्ड्रेन फ्युचर इंडिया संस्थेच्या अक्षदा सावंत उपस्थित होत्या. आरोग्य शिबिरासाठी सीबीडी येथील अपोलो हॉस्पिटलने संयोजन केले. आदी मान्यवर उपस्थित होते.
खारपाडा येथे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी, मधुमेह तपासणी, हाडांची तपासणी, उंची, वजन, ईसीजी आदी वैद्यकीय तपासण्या सदर शिबिरात करण्यात करण्यात आल्या. यावेळी खैरासवाडीतील 150 आदिवासी कुटुंबान्ना अन्न धान्य किट देण्यात आले, अशी माहिती यावेळी लायन्स क्लब सीबीडीच्या सचिव दिपा मौर्य यांनी यावेळी दिली.
Be First to Comment