खड्डे मुक्त कामोठ्यासाठी
पालिकेविरोधात आंदोलन !
पनवेल, प्रतिनिधी : कामोठे सेक्टर 8 येथील पाण्याच्या टाकी समोर गेल्या अनेक महिन्यांपासून खड्डा खोदून ठेवला आहे. तसेच ह्या खड्डयाच्या आजुबाजुच्या रस्त्यावर सुद्धा मोठे मोठे खड्डे पडले असुन रस्त्यावर पुर्ण चिखल झालेला आहे. पोलीस स्टेशन ते ऐश्वर्या हॉटेल ह्या मुख्य रहदारीचा रस्ता असुन खड्डयामुळे अणि चिखलामुळे अनेक दुचाकीस्वरांचा घसरून अपघात झाला आहे. अनेक नागरीक ह्या रस्त्याने ये जा करत असतात परंतु रस्त्यावरील खोद काम अणि चिखलामुळे अनेक नागरिकांना चालणे सुद्धा मुश्किल झाले आहे. जेष्ठ नागरिक अणि महिला ह्यांची ह्या रस्त्यावरुन चिखलातून चालताना अक्षरश: तारांबळ उडत आहे. दोन दिवसापूर्वी एक जेष्ठ नागरीक महिला चिखलामुळे पाय घसरून पडल्याची माहिती आजुबाजुच्या सोसायटींमधील नागरिकांनी दिली. हीच परिस्थिती संपूर्ण कामोठे शहरातील रस्त्यांची आहे. गॅस पाईपलाईन च्या कामासाठी रस्ते खोदले असून अजून सुद्धा पालिकेकडून खड्डे बुजवून रस्ते दुरुस्ती केली गेली नाही. ह्या बाबत कामोठे कॉलोनी फोरमच्या वतीने वारंवार पाठपुरावा करूनही पालिका कारवाई करत नाही. पालिकेच्या वतीने सदर समस्येची तात्काळ दखल घेत जर पालिकेने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू न केल्यास कामोठे कॉलोनी फोरमच्या वतीने पालिके विरोधात तीव्र आंदोलन केले । कामोठे कॉलोनी फोरमच्या महिला टीम द्वारे पालिके विरोधात शहरातील खड्डे भ्रष्टाचाराचे अड्डे , रस्त्यावरील खड्डे कसे गोल गोल, पैशाचा झाला झोल झोल, इकडे तिकडे चोहीकडे, खड्डेच खड्डे सगळीकडे, पालिका प्रशासन दमदार, खड्डा शानदार अशा घोषनांचे फलक पकडत सेक्टर 8 येथील सिडकोच्या जलकुंभा समोर पालिकेविरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आले.
कामोठे कॉलोनी फोरम अध्यक्षा जयश्री झा ह्यांनी प्रशासनाला जाब विचारला. हया आंदोलना मध्ये रंजना सडोलीकर मॅडम, कॉलनी फोरमच्या महिला समन्वयक शुभांगी खरात, शीतल दिनकर, सुप्रिया माने, उषाकिरण शिंगे, संजीवनी तोत्रे, मुक्ता घुगे, सुनीता निर्मळ, मधुरा घाग,स्मिता गायकवाड, छाया कांबळे, अरुणा भेके तसेच आजूबाजूच्या परिसरातील महिला सहभागी झाल्या होत्या.
Be First to Comment