- कोकण दर्पणची पत्रकारिता संविधानिक मूल्यांची जपणूक करणारी !
पनवेल महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर यांचे प्रतिपादन !
- कोकण दर्पणच्या लेखणीत बातमीचा अचूक वेध घेण्याचे कौशल्य !
राष्ट्रवादीचे नवी मुबई जिल्हाध्यक्ष अधिक गावडे यांचे गौरवोद्गार !
- कोकण दर्पणची पत्रकारिता समतामूलक समाज घडविणारी !
जेष्ठ विचारवंत डॉ. जी.के. डोंगरगावकर यांचे प्रतिपादन !
पनवेल : कोकण दर्पण हे वृत्तपत्र सातत्याने समाजाचे प्रश्न मांडत असते. कोणावर अन्याय होत असेल तर निर्भीडपणे कोकण दर्पण आपली भूमिका मांडत असते, कोकण दर्पणची पत्रकारिता संविधानिक मूल्यांची जपणूक करणारी आहे, असे प्रतिपादन पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी खारघर येथे केले.
संपूर्ण कोकणाचे मुखपत्र असलेल्या कोकण दर्पण वृत्तपत्राचा ११ वा वर्धापन दिन २६ जानेवारी रोजी खारघर येथील सत्याग्रह कॉलेज सभागृहात संपन्न झाला. यावेळी परेश ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कोकण दर्पणने मागील ११ वर्षात चांगली प्रगती केली. प्रवास संघर्षाचा होता, मात्र, खडतर प्रवासात देखील कोकण दर्पणने आपला मार्ग सोडला नाही, तर बदलत्या काळानुरूप कोकण दर्पणने कोकण लाईव्ह यु ट्यूब चॅनल आणि कोकण दर्पण वेब पोर्टल सुरु केले, नक्कीच कोकण दर्पणचा आलेख हा चढता राहिला, असे अशी भावना परेश ठाकूर यांनी व्यक्त करीत कोकण दर्पणच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, सत्याला सत्य, आणि वाईटाला वाईट म्हणण्याची क्षमता कोकण दर्पण मध्ये आहे. एखादी बातमी किव्हा लेख कसा लिहायचा, याचे कौशल्य कोकण दर्पण आणि त्यांचे संपादक संजय महाडिक यांच्याकडे आहे. बातमीचा अचूक वेध कसा घ्याचा याचे शास्त्र कोकण दर्पणकडे आहे, असे प्रतिपादन नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अशोक गावडे यांनी यावेळी केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जी.के. डोंगागावकर यांनी कोकण दर्पणच्या सिद्धांतिक पत्रकारितेचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत समतामूक समाज घडविणारी कोकण दर्पण करीत आहे, असे मत डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी व्यक्त केले.
कोकण दर्पण वर्धापन दिनाचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिका स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण समिती सभापती हर्षदा अमर उपाध्याय, अ प्रभाग समिती सभापती संजना समीर कदम यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी जेष्ठ पत्रकार शरद सावंत, भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेविका नेत्रा किरण पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेस खारघर शहर अध्यक्षा राजश्री कदम, योगाचार्या डॉ मनीषा सोनावले, भाजप नेते अमर उपाध्याय, भाजपनेते समीर कदम, भाजप नेते किरण पाटील, भाजप सरचिटणीस दीपक शिंदे, भाजप खारघर शहर महिला मोर्चा उपाध्यक्षा प्रतीक्षा मंगेश कदम, प्रा. किरण गजेवार, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोकण दर्पणचे संपादक संजय महाडिक यांनी यावेळी कोकण दर्पणच्या ११ वर्षाच्या प्रवासावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार तथा भीम संग्रामाचे संपादक मुकेश शिंदे त्यांनी केले. कोकण दर्पण, कोकण लाईव्हचे संपादक संजय महाडिक यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.