पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल शहर जिल्हा क्षेत्रातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रवादी युवकप्रदेश अध्यक्ष महेबूब शेख, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या उपस्थितीत तसेच पनवेल शहर जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद बागल, कार्याध्यक्ष शाहबाझ पटेल यांच्यापुढाकाराने पनवेल मधील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके, युवक सरचिटणीस रणजित नरुटे उपस्थित होते.
कोकण दर्पण.