- नागरिकांनी संविधानिक कर्तव्य समजून घ्यावीत : अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांचे आवाहन !
- मातृभूमीचे रक्षण म्हणजे स्वातंत्र्याचे रक्षण : संपादक, लेखक संजय महाडिक यांचे प्रतिपादन !
धुळे : भारतीय संविधानाने आपल्याला दिलेल्या संविधानिक अधिकारासाठी आपण नेहमी लढतो, परंतु आपण आपली कर्तव्य देखील समजून घेतली पाहिजेत. नागरिकांना मुलभुत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे राज्य घटनेतील कलमांनुसार आपली जबाबदारी ओळखावी, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी धुळे येथे केले.
देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लाखो वीरांनी आपल्या प्राणांचे बलीदान दिले, आणि आपल्या मातृभूमीचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी लाखो जवानांनी आपले प्राण अर्पण केले. देशासाठी , मातृभूमीसाठी बलिदानाची, त्यागाची, शौर्याची परंपरा म्हणजे आपल्या भारताचा गौरव आहे, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार, लेखक व संपादक संजय महाडिक यांनी धुळे येथे केले.
धुळे येथील शिवराय मित्र मंडळ आणि बाबु नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलनी यांच्या वतीने भारतीय संविधान दिन आणि २६/११ मधील शहीद जवांना श्रदांजली व शहीद जवान योगेश पाटील यांच्या जीवनावर आधारित शौर्यश्री ग्रंथाचे प्रकाशन अशा संयुक्तिक कार्यक्रमाचे धुळे येथे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी हुतात्मा योगेश पाटील यांच्या स्मृतीस २६/११ शहीद दिनी उजाळा देत “शौर्यश्री“शहीद योगेश पाटील” या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
वीरपिता शिवाजी फकीरा पाटील, वीरमाता सुनिता शिवाजी पाटील, बाबु नेताजी कॉलनीतील राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या सहयोगातुन शहीद योगेश सुनीता शिवाजी पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ २६/११ रोजी कृतज्ञता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . प्रा.अहिरे व प्रा.संदिप माळी, कुसुंबा यांनी आलेल्या अतिथींचे स्वागत कर्णमधुर गिताने केले. तसेच देशभक्तीपर गितेही सादर केली म्हणुन कार्यक्रमास आगळीवेगळी रंगत चढली. क्रार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.प्रा.यु.वाय.गांगुर्डे यांनी चपखळ, यथायोग्य रंगतदार शैलीतुन केले.
या कार्यक्रम प्रसंगी शौर्यश्री पुस्तकाचे लेखक, संपादक संजय महाडीक, धुळ्याचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु, राजगुरु,पोलीस , नगरसेवक गोपिचंद नाना, नरेश चौधरी, गन्नाथ सुर्यवंशी, .कमलेश भदाणे, रोहीणी कमलेश भदाणे, श्री धुमाळे, आर.जी.पाटील आदी व्यासपिठावर उपस्थित होते.
दिपप्रज्वलन व उदघाटन,प्रतिमापुजन, शहीद जवानास पुष्पचक्र अर्पण करुन सर्व मान्यवरांच्या पावन उपस्थितीत पार पडले. श्री पगारे यांनी प्रस्ताविक करुन कार्यक्रमाचा हेतु स्पष्ट केला. ज्यांनी प्रांगण फुलविण्यासाठी विशेष योगदान देणारे आमदार कुणालबाबा पाटील, आमदार फारुक शाह, चंदु बापु सोनार, प्रदिप नाना कर्पे विद्यमान महापौर,म.न.पा.धुळे, यांचे विशेष आभार मानले. त्यानंतर वीरपिता, आप्तेष्ठांच्या व कॉलनीतील विजय पाटील, एस.एस.पाटील, श्री माळी, प्रदिप अहिराव, मोरे, चंद्रकांत सोनवणे, प्रा.श्री पवार, प्रदिप पाटील, श्री बडगुजर, कामेश्वर सोनवणे, बापुराव पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत केले.
लेखक, संपादक संजय महाडीक यांनी शहीद योगेशच्या जीवनावर अधारीत लिहीलेल्या “शौर्यश्री योगेश पाटील” या गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर संजय महाडीक यांनी २६ /११ /२००८ ला घडलेला प्रसंग, १८ पोलीस अधिकाऱ्यांना आलेले विरमरण व शहीद योगेश यांची कौटुंबिक प्रतिमा जनसमुदाया समोर मांडली. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी नागरिकांना मुलभुत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे राज्य घटनेतील कलमांनुसार आपली जबाबदारी ओळखावी असे प्रतिपादन केले. तसेच तरुण पिढीला संस्कार पेरण्यावरही प्रकाश टाकला. देशभक्ताबद्दल नागरिकांच्या हृदयात प्रेम, ओलावा, जिव्हाळा असल्यानेच हा कार्यक्रम आयोजीत केला गेला याचे बच्छाव यांनी विशेष कौतुक केले. एस.एस.पाटील यांनी आभार प्रदर्शनाची धुरा सांभाळली. सर्व शहीदांना सामुहिक श्रध्दांजली अर्पण करुन ,राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. अशा तऱ्हेने खेळीमेळीच्या व सहकार्याच्या बळावर प्रस्तुत राष्ट्रप्रेम जागविणारा कार्यक्रम संपन्न झाला.