नांदेड : येथील श्री गुरुगोविंदसिंघजी पत्रकारिता महाविद्यालयामध्ये ७२ वा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच २६ /११ च्या मुंबईतील झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहिद झालेल्या वीर पोलिस जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. सर्वप्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सर्वप्रथम संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विपिन कदम यांनी केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य तथा संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास कदम सरांनी संविधान दिनाचे महत्त्व विषद केले. महत्त्व विषद करतांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘घटना मसुदा समिती’ने किती अथक परिश्रमाने 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात जगात आदर्श ठरेल असे परिपूर्ण संविधान आपल्या देशाला दिले आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक संजय नरवाडे, प्रा. अमोल धुळे, सौ. शारदा कुलकर्णी, रोहित माळी, बालाजी कुलकर्णी, अनितकेत कांबळे, पत्रकार गंगाधर शितळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर पाईकराव यांनी केले तर प्रा. संजय नरवाडे यांनी आभार व्यक्त केले.
श्री गुरुगोविंदसिंघजी पत्रकारिता महाविद्यालयात ७२ वा संविधान दिन साजरा ! २६/११ हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली !
More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »