पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : नमो नमो मोर्चा भारत संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आर के दिवाकर यांची नमो नमो उत्तर भारतीय मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
आर के दिवाकर हे मागील अनेक वर्षांपासून समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहेत. भाजप ओबीसी सेलच्या प्रदेश चिटणीस पदाची त्यांच्यावर जबाबदारी आहे. ओबीसींच्या न्याय-हककसाठी दिवाकर यांचे कार्य सातत्याने सुरु आहे. पक्ष निष्ठा आणि सामाजिक कार्यातील सातत्य पाहून त्यांच्यावर नमो नमो उत्तर भारतीय मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
नमो नमो उत्तर भारतीय मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी संतोष शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात पनवेल भाजपमध्ये सक्रिय असलेले संतोष शर्मा यांची नमो नमो उत्तर भारतीय मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आर के दिवाकर यांनी नियुक्ती केली आहे. संतोष शर्मा मागील अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.
कोकण दर्पण.