पनवेल , कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रीराम मंदिराबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजपने त्यांच्याविरोधात आंदोलन सुरु केले आहे.
श्रीरामचंद्रांच्या’ नावाची आठवण करून देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्रच्या वतीने आगळे वेगळे आंदोलन सुरू केले आहे. ‘जय श्री राम’ असे लिहिलेली १० लाख पत्र सिल्व्हर ओक, मुंबई या त्यांच्या निवास स्थानी पाठवण्याचे आंदोलन सुरू केले आहे.
या मोहिमेची सुरुवात बुधवारी पनवेल येथून युवकांनी लिहिलेली व नागरिकांकडून जमा केलेली २००० पत्र नविन पनवेल येथील पोस्ट ॲाफीस मध्ये भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जमा करण्यात आली. यावेळी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, उपाध्यक्ष अमर ठाकूर ,जिल्हा सरचिटणीस शेखर तांडेल व दिनेश खानावकर, युवानेते हॅप्पी सिंग,युवा नेते प्रशांत कदम, युवा नेते समीर कदम, जिल्हा चिटणीस चिन्मय समेळ, खजिनदार भूषण जळे, सदस्य जमीर शेख, तसेच युवा मोर्चा कामोठे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील,सरचिटणीस नवनाथ भोसले, खारघर आणि तळोजा अध्यक्ष विनोद घरत सरचिटणीस अमर उपाध्याय,खजिनदार प्रमोद पाटील पनवेल ग्रामीणचे अध्यक्ष आनंद ढवळे, सरचिटणीस विश्वजित पाटील, कळंबोली अध्यक्ष गोविंद झा, सदस्य अझर शेख, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, सरचिटणीस गौरव कांडपिळे तसेच पनवेलमधील पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थितीत होते.
यावेळी उत्तर रायगड जिल्ह्यातून २० हजार पेक्षा अधिक पत्रे पाठवण्याचा निर्धार युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.