Press "Enter" to skip to content

खारघर येथील रक्तदान शिबिरात १५० रक्तदात्यांनी केले रक्तदान ! श्रीकच्छ वागड लेवा पाटीदार मंडळाचे आयोजन !

पनवेल : श्रीकच्छ वागड लेवा पाटीदार मित्र मंडळ, खारघर व टाटा कॅन्सर हॉस्पिटल,खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर सेक्टर २० येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाला.खारघर, कामोठे, रोडपाली, खांदा कॉलोनी, कलंबोळी येथील सुमारे १५० समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. अतिशय नियोजन पध्दतीने हा कार्यक्रम पार पडला.
समाजाचे प्रमुख प्रवीणभाई वाविया, उपप्रमुख अंबालाल पटेल, उपप्रमुख वालजीभाई पटेल, निलेश भाटेसरा कामोठे, राघुभाई पटेल, नरसिंहभाई पटेल, दिलीप वेळजी कळंबोली, वीरजीभाई पटेल कळंबोली, भवानभाई हथीयानी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. तसेच पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक रामजीभाई बेरा यांचे विशेष योगदान लाभले.या शिबिराला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली,
खारघर तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक रामजीभाई बेरा, सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष बीना गोगरी, व्यापारी सेल संयोजक अंबालाल पटेल, वैद्यकीय विद्यार्थी आघाडीचे संयोजक विजय उजळंबे, आदर्श सोहनी यांची विशेष उपस्थिती होती. खारघर मंडल सरचिटणीस दीपक शिंदे यांचा मुलगा श्लोक दीपक शिंदे याने शिबिरात रक्तदान करून वाढदिवस साजरा केला.

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »