पनवेल : मागील तीन महिन्यांपासून गंभीर बनलेल्या पाणी प्रश्नाबाबत जाब विचारण्यासाठी कामोठे शहर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामोठे पाणीपुरवठा अधिकारी यांची भेट घेतली.
कामोठे शहरात मागील तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा अनियमित होत असून ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतं आहे. सदर मुख्य प्रश्नाबाबत पनवेल महानगरपालिका मूग गिळून गप्प बसली आहे. मंगळवारी सदर प्रश्नाबाबत वाचा फोडत कामोठे शहर महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते पाणीपुरवठा ऑफिसमध्ये गेले व त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.
यावेळी अधिकाऱ्यांनी चार दिवसांत समस्या सोडण्यात येईल असे आश्वासन दिलं, आणि बऱ्यापैकी सोसायट्यांच्या तक्रारी सोडवून त्यांच्या पाणीपुरवठा सुद्धा सुरळीत केला.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते तथा महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरदासदादा गोवारी, शेकाप नेते तथा नगरसेवक शंकर म्हात्रे, काँग्रेसचे डॉ धनंजय क्षीरसागर, शिवसेनेचे शहरप्रमुख राकेश गोवारी व आघाडी चे स्थानिक नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कामोठे येथील पाणी प्रश्नावर महाविकास आघाडीची पनवेल मनपा कार्यलयवर धडक !
More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
More from RaigadMore posts in Raigad »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »
More from ThaneMore posts in Thane »