*लोकनेते दि बा पाटील चळवळ स्पर्धेनिमित्त
*दशरथ भगत यांनी घेतली मा.खासदार
रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट* !
पनवेल, प्रतिनिधी : नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था आयोजित दि बा पाटील स्फूर्तीस्थान चळवळ स्पर्धेस अधिक मार्गदर्शन व पाठबळ मिळावे यासाठी स्पर्धेचे आयोजक व नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी आज माजी खासदार तथा लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी रामशेठ ठाकूर यांना दि बा चळवळ स्पर्धेचा मजकूर असलेले विनंतीपर निवेदन देण्यात आले.
यावेळी स्पर्धेच्या संयोजन समितीतील गज आनन म्हात्रे (जेष्ठ कवी, साहित्यिक, नाटककार ), दिपक पाटील (सदस्य – लोकनेते दि. बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती तथा अध्यक्ष – २९ गाव संघर्ष समिती, नवी मुंबई.), शैलेश घाग (आयोजक संस्थेचे प्रवक्ते तथा सक्रिय सदस्य विमानतळ नामकरण चळवळ ), प्रताप पाटील ( उपाध्यक्ष – २९ गाव संघर्ष समिती, नवी मुंबई) हे उपस्थित होते.
Be First to Comment