पनवेल : कामोठे शहर आणि संपूर्ण पनवेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन मजबूत करणार, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सुरदासदादा गोवारी यांनी कामोठे येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सुरदासदादा गोवारी यांच्या अध्यक्षतेखाली कामोठे येथे नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी सुरदासदादा गोवारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी कामोठे शहर अध्यक्ष चंद्रकांत नवले, पनवेल जिल्हा उपाध्यक्ष अजिनाथ सावंत, वागेश पवार, अनंत वारे, रवींद्र गवळी, सुर्यकांत शिंदे, बबन पवार,राहुल यमगणी,किशोर मुंडे, महेंद्र पाटील,प्रकाश आंगणे, राहुल यादव, श्री, रामीष्ठ, संदेश कोठेकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.