Press "Enter" to skip to content

पनवेल महापालिकेचे फेरीवाला धोरण लवकरच निश्चित होणार !

पनवेल : महापालिकेचे फेरीवाला धोरण लवकरच निश्चित होणार असून त्यासाठी सिडकोकडे भूखंडाची मागणी केली असल्याची माहिती अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी (१६ नोव्हेंबर) झालेल्या फेरीवाला समितीच्या बैठकीत दिली.यावेळी उपायुक्त गणेश शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस सहाय्यक पोलिस आयुक्त भागवत सोनवणे, सहाय्यक वाहतुक पोलिस अधीक्षक गणेश खांडेकर, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, नगर रचना अधिकारी ज्योती कवाडे फेरीवाला समितीचे सदस्य, प्रभाग अधिकारी, पालिका अधिकारी उपस्थित होते. गरज पडल्यास दर महिन्याला बैठक घेऊन फेरीवाला धोरण लवकरच निश्चित करण्यात येईल. पुढच्या बैठकीत ना-फेरीवाला क्षेत्राबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच सिडकोकडून हस्तांतरीत होणाऱ्या भूखंडावर फेरीवाला धोरण कशा पध्दतीने राबविण्यात येणार हे लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे उपायुक्त गणेश शेटे यांनी सांगितले. यावेळी फेरीवाला धोरणाबाबत समिती सदस्यांबरोबर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. फेरीवाला धोरणाबाबत प्रेझेन्टेशन दाखविण्यात आले

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »