पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल मनपाचे खारघर प्रभाग ६ मधील नगरसेवक ऍड. नरेश ठाकूर यांनी आपत्कालीन परिस्थितीत रस्त्यावर कोसळलेली झाडे बाजूला करून घेतली. खारघर सेक्टर ८, १० आणि कोपरा गाव परिसरात मुसळधार आणि वादळी पावसाच्या तडाख्याने अनेक ठिकाणची झाडे कोसळली. त्यामुळे रस्ते बंद झाले, वाहतूक ठप्प झाली. ते सर्व रस्ते, परिसर नगरसेवक नरेश ठाकूर यांनी स्वच्छ करून घेतला.
कोकण दर्पण.