Press "Enter" to skip to content

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ ! नवी मुंबई देशातील प्रथम क्रमांकाचे सर्वात स्वच्छ शहर ! महाराष्ट्र राज्यात नवी मुंबई नेहमीप्रमाणेच नंबर वन !

  • सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज’ अभियानात नवी मुंबईला देशात व्दितीय क्रमांकाचे मानांकन !
  • कचरामुक्त शहराचे ‘फाईव्ह स्टार’ मानांकन व ओडीएफ कॅटेगरीमध्ये ‘वॉटरप्लस’ मानांकन मिळविणारे नवी मुंबई राज्यातील एकमेव शहर !
    नवी मुंबई : “स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण 2021” मध्ये नवी मुंबई शहरास 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या देशातील मोठ्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकाच्या सर्वात स्वच्छ शहराचा (1st Rank as India’s Cleanest Big City) बहुमान प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्यात नेहमीप्रमाणेच नवी मुंबई नंबर वनचे स्वच्छ शहर आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित ‘स्वच्छ अमृत महोत्सव’ विशेष समारंभात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी हा सन्मान केंद्रीय नागरी विकास व गृहनिर्माण मंत्री ना.श्री.हरदीपसिंह पुरी यांच्या शुभहस्ते, केंद्रीय सचिव श्री.दुर्गाशंकर मिश्रा व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्विकारला.* *नवी मुंबई महानगरपालिकेस या विशेष समारंभात आणखी तीन महत्वाचे सन्मान प्राप्त झाले असून स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ‘सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज’ अभियानात नवी मुंबई देशातील व्दितीय क्रमांकाचे मानांकीत शहर ठरले आहे. तसेच ‘कचरामुक्त शहरांमध्ये’ नवी मुंबई महानगरपालिकेने आपले ‘फाईव्ह स्टार मानांकन’ कायम राखले आहे. त्याचप्रमाणे ओडीएफ कॅटेगरीमध्ये नवी मुंबई शहरास ‘वॉटर प्लस’ या सर्वोच्च मानांकनाने सन्मानीत करण्यात आले. या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छ भारत मिशन कक्ष विभागांचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, परिमंडळ 2 उपआयुक्त श्री. अमरीश पटनिगेरे उपस्थित होते. ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ मध्ये देशभरातील 4320 शहरे सहभागी झाली होती. यामध्ये 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये देशातील प्रथम क्रमांकाच्या सर्वात स्वच्छ शहराच्या (India’s Cleanest Big City) पुरस्काराने नवी मुंबई महानगरपालिकेस गौरविण्यात आले. *’स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार रेटींग प्राप्त करणा-या देशातील 9 शहरांमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील ‘फाईव्ह स्टार मानांकन’ प्राप्त एकमेव शहर आहे. तसेच हागणदारीमुक्त शहरांच्या श्रेणीतील (ओडीएफ) ‘वॉटरप्लस’ हे सर्वोच्च मानांकन मिळविणा-या देशातील 9 शहरांमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे.
    *शहर स्वच्छतेबाबत अत्यंत जागरूक असलेल्या नवी मुंबईकर नागरिकांनी सक्रीय सहभाग घेत केलेल्या स्वच्छता कार्याचे फलित म्हणजे हे राष्ट्रीय सन्मान असल्याचे सांगत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी हे पुरस्कार स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांना समर्पित केले आहेत.*
More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »