Press "Enter" to skip to content

उद्धव ठाकरे जनतेची काळजी करणारे मुख्यमंत्री ! खा. श्रीरंग बारणे !

  • शिवसेनेत ८० टक्के समाजकारण – जिल्हाप्रमुख शिरीष घरत !

  • पनवेल : राष्ट्रवादी पक्षाचे पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष तथा उद्योजक आणि धनगर समाजाचे नेते आबासो रामचंद्र लकडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेवून शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. खारघर येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेचे खासदार श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे आणि रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यानंतर शिवसेना पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची रीघ लागली. महाराष्ट्रात शिवसेनेच्या पक्षाची ताकद वाढत चालली असल्यामुळे यामध्ये रायगड जिल्हा सुद्धा मागे राहिला नाही. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. मंगळवारी खारघर येथील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रवेश कर्त्याना संबोधताना सांगितले की, शिवसेना पक्षमध्ये काम करण्यासाठी चांगले वातावरण आणि चांगला वाव मिळत असतो, त्यामुळे या पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह नेहमीच वाढलेला पहावयास मिळत असतो. कोरोनाच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाची दखल देशभरातून घेण्यात आली, त्यामुळे नियोजन आणि संयम ठेवून जनतेची काळजी कशी घ्यावी हे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिले आहे. आणि याचा प्रभाव आज संपूर्ण महाराष्ट्रातील विविध संघटनांचे पदाधिकारी असोत किंवा मग पक्षांचे पदाधिकारी असोत हे आता शिवसेनेचे शिवबंधन आपल्या मनगटावर बांधण्यासाठी पुढे सरसावले आहेत. आम्ही या सर्वांचे स्वागत करून त्यांना जनतेच्या हितासाठी चांगले काम करता येईल यासाठी त्यांना वाव निर्माण करून देत आहोत. या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह जिल्हाप्रमुख शिरीष घरत, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, पनवेल विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, उपमहानगरप्रमुख दीपक घरत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »