प्रतिनिधी, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर प्रभाग क्र. ४ येथील सेक्टर १९,२० व २१ मध्ये वादळी पावसाने अस्ताव्यस्त पडलेली झाडे,लाईटचे खांब व इतर गोष्टी यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासातून तात्काळ सोडविण्यासाठी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर व महानगरपालिका गटनेते परेश ठाकूर यांनी टी.आय.पी.एल.कंपनीमार्फत ४ डम्पर,१ जेसीबी व २ ट्रॅक्टर पाठवून महानगरपालिका प्रभाग समिती ( अ ) चे माजी सभापती तथा जेष्ठ नगरसेवक अभिमन्यू धर्मा पाटील यांच्यामार्फत सदर ठिकाणांची साफसफाई व स्वच्छता करवून घेतली. यावेळी अभिमन्यू धर्मा पाटील यांच्यासह प्रतिक्षा कदम साधना पवार, अशोक पवार, नितेश पाटील, काशिनाथ घरत,आदी उपस्थित होते.
कोकण दर्पण