सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
HappyBirthday Vijay Patil Saheb.
आपणास ज्ञात असल्याप्रमाणे, २०२० च्या प्रारंभीच्या काळात संपूर्ण विश्वासमोर कोरोनाचे प्रचंड मोठे संकट उभे राहिले आणि प्रगत आणि प्रगतीशील देशातील आरोग्य विभागासाठी कोरोनाचा आजार एक अनिश्चित आव्हान ठरले. अर्थातच महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि लागोलाग नवी मुंबईत सुद्धा परिस्थिती गंभीर स्वरूप धारण केली.म्हणूनच डॉ डी वाय पाटील रुग्णालयातर्फे मार्च २०२० पासून स्वत:च्या पुढाकाराने वैद्यकीय शिबिरे, चाचणी आणि उपचार सुरू करण्यात आले. तदनंतर विविध महानगर पालिकेच्या सहकार्याने ही यंत्रणा अधिक प्रभावी आणि सर्वव्यापक करण्यात आली.
०४/०४/०४ च्या मुहूर्तावर सेवारत झालेल्या या रुग्णालयाच्या वास्तू उभारणी पासून सुसज्ज अद्यावत वैद्यकीय साधने आणि सर्वोत्तम वैद्यकीय मनुष्यबळातर्फे नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील रहिवाशांना अत्यल्प दरात उपचार उपलब्ध करून दिल्याचे सारं श्रेय जाते ते समुहाचे अध्यक्ष विद्यापीठाचे डॉ विजय पाटील यांना.
शिक्षण, आरोग्य आणि क्रिडा क्षेत्राचे गाढे भक्त असलेले डॉ विजय पाटील हे स्वतः एक उच्च विद्याविभूषित उत्तम क्रीडापटू आणि सुप्रसिद्ध संचालक आहेत. शिक्षण महर्षी डॉ डी वाय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मानवी मुल्य आत्मसात केलेल्या डॉ विजय पाटील साहेबांनी समाजातील अत्यंत गरजू आणि तळागाळातील लोकांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान आणि उपचारपद्धती पुरविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.
ज्ञानपुष्प आरोग्य योजना,विजय पाटील आरोग्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना, धर्मदाय आरोग्य योजना, पोलिस आरोग्य योजना अशा अनेक योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत लाखो रुग्णांना मोफत किंवा अत्यल्प दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे श्रेय डॉ विजय पाटील यांना जाते.
याशिवाय विविध क्रीडापटू, अपघात ग्रस्त, विविध अशासकीय संस्थेतील अनाथ बालके आणि इतर रुगणे, आदिवासी शाळेतील विद्यार्थी आणि सांगली जिल्ह्यातील दुर्धर ह्रदयरोग आजाराने ग्रस्त ६५ बालकांना संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया करून देण्याचे कार्य सुद्धा डॉ विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली अखंड चालू होते आणि आजही चालू आहे
अशातच कोविडचे वैश्विक आव्हान उभे राहिले. परिस्थिती आणि उपचार पद्धती अल्प प्रमाणात माहिती असल्यामुळे सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण झाली. अशा प्रतिकूल परिस्थितीतही, डॉ विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ डी वाय पाटील रुग्णालयात कोरोनावर सर्वतोपरी उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणूनच मार्च २०२० पासून भयभीत, असहाय, गरजू अशा अनेक रुग्ण मित्रांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी डॉ डी वाय पाटील रुग्णालयातील व्यवस्थापकिय टीम मेंबर, कोरोनाच्या बाह्य आणि आंतररुग्ण विभागात कार्यरत सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय समाज सेवा अधिकारी, पॅरॉमेडिकल स्टाफ, साफसफाई कर्मचारी असे सर्वजण अहोरात्र प्रयत्न करून रुग्ण कल्याणासाठी प्रचंड यशस्वी कार्य केले.
नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, ठाणे महानगरपालिकेच्या, पोलिस दलातील अधिकारी, महाराष्ट्र शासन आणि सर्व रुग्ण आणि नातेवाईक यांच्या सहकार्याने आणि योग्य उपचार पद्धतीस यश मिळाल्याने, हजारों व्यक्ती व्यवस्थीत होऊन घरी परत गेले आहेत.
कोरोना च्या पुर्वी अथवा नंतरही, सर्व प्रकारच्या स्पेशालिटी,सुपर स्पेशालिटी विभागातर्फे अत्यल्प दरात अत्याधुनिक सेवा पुरविल्या जात असल्याने, असंख्य रुग्ण मित्र आपपल्या आजारावर मात करून आपले आयुष्य निरोगी पणे जगत आहेत.
त्या सर्व रुग्ण मित्रांना वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील सर्वा तर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा..!
समुहात सेवावृत्तीने कार्यरत सर्वा तर्फे आपणांसमोर एक गोष्ट निश्चित नमूद करावीशी वाटते की, परिस्थिती अनिश्चित आहे, पण ‘विजय’ सर्वांचा निश्चित आहे.
Compassion #Care #cure
नेतृत्व, कर्तत्व आणि दातृत्वाचे एकमेवाद्वितीय उदाहरण असणाऱ्या माननीय #डॉविजयपाटीलसाहेब यांचा आज जन्मोत्सव..!
ज्ञान आणि विज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण, आरोग्य आणि क्रिडा क्षेत्रात अतुलनीय योगदान देऊन गौरवशाली कार्य करणाऱ्या आम्हा सर्वांच्या आदर्शांना जन्मोत्सवाच्या मंगलदिनी अभिवादन आणि आभाळभर हार्दिक शुभेच्छा..!
डॉ. श्याम मोरे, नवी मुंबई






Be First to Comment