नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संपाच्या अनुषंगाने नवी मुंबई व कर्जत विभागातील नोकरी, धंदा, विविध व्यवसाय करणारे प्रवाशी तसेच लोकप्रतिनिधी यांचेकडून मोठ्या प्रमाणात वारंवार केल्या जात असलेल्या मागणीनुसार तसेच या कार्यक्षेत्रात असलेल्या शाळा, कॉलेजेस सुरू होत असल्याने प्रवाशी जनतेच्या हितार्थ बुधवार १७ नोव्हेंबर पासून एमएमएमटी बसचा नवीन बस मार्ग क्र.४९ नवी मुंबई ते कर्जत असा सुरू करण्यात येत आली आहे.
नवी मुंबई ते कर्जत बस मार्गाची संक्षिप्त माहिती –
प्रवास मार्ग :
बेलापूर रेल्वे स्थानक, बेलपाडा गाव / खारघर रेल्वे स्थानक, स्पॅगेटी /घरकुल, कामोठे गाव / के.एल.ई.कॉलेज, आसुडगाव आगार, ठाणा नाका, पनवेल रेल्वे स्थानक (सर्कल), भिंगारी, हॉटेल राहुल पार्क, कोन गाव, शेंडुग, ठोंबरेवाडी / गोदरेज सिटी, बारवईगाव -1, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण कार्यालय, लोधिवली, चौक नाका, एन.डी.स्टुडीओ / आदिवासी पाडा, इंद्रप्रस्थ / ठाकूर इस्टेट, वावर्ले, हालफाटा, कर्जत बस स्थानक,
बस संख्या : ८
प्रस्थानांनतर : ३० ते ३५ मिनिटे
पहिली बस
बेलापूर रेल्वे स्थानक : ६ .४५ वाजता
कर्जत बस स्थानक : ६ .५० वाजता
शेवटची बस
बेलापूर रेल्वे स्थानक : २० .४५ वाजता
कर्जत बस स्थानक : २१ .१५ वाजता
तरी सदर बस सेवेचा लाभ सर्व प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत करण्यात आली आहे.