Press "Enter" to skip to content

३५० दिवे लावून कामोठ्यात प्रथमच नवा निर्धार !

३५० दिवे लावून कामोठ्यात प्रथमच नवा निर्धार!

पनवेल, प्रतिनिधी : कामोठे शहरामधी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी दिवाळीचा पहिला दिवा अर्पण करून दिवाळी सण साजरा करण्यात आला. या दीपोत्सवात ३५० शिवराज्यभिषेक दिनाला 350 वे वर्ष सुरु या सुवर्ण वर्षी 350 दिवे लावून दीपोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आला.
कामोठे शहरात प्रथमच निर्धार सामाजिक संस्थेमार्फत भव्य दीपोत्सव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ३५० दिव्यांच्या लख्ख प्रकाशात ‘जय शिवराय ‘ हा शब्द उजळून निघाला.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे ३५० गडकिल्ले आहेत. या धर्तीवर स्वराज्य संघटना करंजाडे यांच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी ३५०
दिव्यांच्या सहाय्याने जय शिवराय नाव साकारण्यात आले होते.

अत्यंत कमी वेळात सुंदर नियोजन करून स्वराज्याचा पहिला दिवा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी ह.भ.पा. गडगे बाबा m यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष निलेश किसन आहेर यांच्या संकल्पनेतून ३५० दिव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोरचे दिव्यांनी परिसरात एक ऊर्जा निर्माण झाल्याची पाहायला मिळाले.
कामोठे शहरात प्रथमच असा दिव्य दिपोस्तव सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमाला निर्धार संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष निलेश आहेर,मंगेश शिंदे,ज्ञानेश्वर चिकणे,किसन माने,अभिषेक शिंदे ,अक्षय चिकणे,अभि देशमाने,धनंजय आहेर,संतोष आलदार,राहुल बुधे,प्रतीक ठिकेकर,नारायण सीरवी व कामोठे शहरातील विविध मंडळे,महिला मंडळे , सामाजिक संस्था,राजकीय पक्ष व इतर मान्यवरांनी महाराजां न चरणी दिवा लावून दिवाळी ची सुरवात केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.