Press "Enter" to skip to content

मोदींच्या १२ वर्षांत भारताचा सर्वांगीण विकास; पंतप्रधान मोदी देशासाठी वरदान – आमदार संजय केळकर

मोदींच्या १२ वर्षांत भारताचा सर्वांगीण विकास; पंतप्रधान मोदी देशासाठी वरदान – आमदार संजय केळकर

केळकरपनवेल (प्रतिनिधी)  देशात २०१४ पूर्वी सातत्याने घोटाळे आणि विविध आरोपांनी ग्रासलेले राज्यकर्ते पाहायला मिळत होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत भारताने सर्वच क्षेत्रांत अभूतपूर्व प्रगती साधली आहे. आज जागतिक स्तरावर भारताची ओळख ‘विश्वगुरू’ म्हणून निर्माण झाली असून भारतीयांना एक नवी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. वर्षातील ३६५ दिवस एकही दिवस सुट्टी न घेता देशसेवेसाठी अहोरात्र कार्यरत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताला लाभलेले वरदान आहेत, असे गौरवोद्गार ठाणे विधानसभेचे भाजप आमदार संजय केळकर यांनी खांदा कॉलनी येथे काढले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळाची १२ वर्षे यशस्वीपणे पूर्ण केल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने भाजपचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या संकल्पनेतून श्रीकृपा हॉलमध्ये शनिवारी सायंकाळी ‘विकसित भारत संकल्प संमेलन’ आयोजित करण्यात आले होते.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार संजय केळकर यांनी २०१४ ते २०२६ या कालावधीत भारताने साधलेल्या विकासाचा सविस्तर आढावा घेतला. मोदी सरकारच्या काळात शिक्षण, आरोग्य, कला, क्रीडा, उद्योग, पायाभूत सुविधा तसेच विविध सार्वजनिक उपक्रमांमध्ये देशाने उल्लेखनीय प्रगती केली असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी,पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृहनेते प्रकाश बिनेदार, महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, सरचिटणीस दीपक बेहेरे, प्रल्हाद केणी,  नगरसेवक एकनाथ गायकवाड, मनोज भुजबळ, दशरथ म्हात्रे, नगरसेविका सीताताई पाटील, दर्शना भोईर, राजश्री वावेकर, मोनिका महानवर, प्रीती जॉर्ज, सरस्वती काथारा, विजयश्री पाटील, कुसुम पाटील, प्रियांका कांडपिले, शिवानी घरत, माजी नगरसेविका सारिका भगत, नीता माळी, पदवीधर प्रकोष्ठचे राज्य संघटक धनराज विसपुते यांच्यासह भाजप उत्तर रायगड जिल्ह्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आजी-माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे समाज उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवर नागरिकांचा सन्मान. शिक्षण, आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक, कलाक्षेत्र, वारकरी संप्रदाय, विविध धार्मिक संस्थांचे पदाधिकारी, तसेच डॉक्टर, वकील आणि पत्रकार अशा विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींना यावेळी निमंत्रित करण्यात आले होते. भाजपच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या संमेलनाला पनवेलमधील नागरिकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.