दि बा पाटील ऊर्जास्थान या चळवळ स्पर्धेतील विजेत्यांचा गुणगौरव सोहळा व संस्थेचा सामाजिक कार्य अहवालाचे सादरीकरण, वाशी येथे संपन्न.
नवी मुंबई, प्रतिनिधी :- नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचा ५वा वर्धापन दिन वाशी मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लोकनेते दि.बा.पाटील स्फूर्तीस्थान या चळवळ स्पर्धेच्या माध्यमातून दिबांचे कार्य साहित्य व कला स्वरुपात सादर केलेल्या गुणवंतांचा गुणगौरव सन्मान सोहळा माजी मंत्री -आमदार गणेश नाईक, दि. बा. पाटील नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष – दशरथदादा पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, दि बां चे सुपुत्र – अतुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
केंद्र व राज्याच्या विविध सरकारी योजनांचा लाभ थेट नवी मुंबईतील नागरिक लाभार्थ्यांना मिळावा यासाठी दिवंगत करसन भगत शासकीय योजना केंद्राचे उद्घाटन देखील लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी बोलताना नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी सांगितले की, दि. बा. पाटील ऊर्जास्थान स्पर्धेत १२ हजारांहुन अधिक संख्येने सर्वसामान्य नागरिक तसेच शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व विविध कला क्षेत्रातील कलावंतांनी सहभाग घेतला आहे व अद्यापही स्पर्धाकांचे अर्ज येत असल्याने त्यांस प्रोत्साहन आणि आशीर्वाद देऊन अधिक स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन पुन्हा करण्यात आले.
दि. बा. पाटील चळवळ स्पर्धेला मिळत असलेला वाढता उस्फुर्त प्रतिसाद लक्षात घेता यातील चित्रकला, लेख, स्फूर्तिगीत लेखन, ऑडिओ, व्हिडीओ, दि. बा. पाटील साहेबांचे दुर्मिळ फोटो (अल्बम), वृत्तपत्र कात्रणे (न्यूज पेपर कटींग) ,चित्रीकरण ( व्हिडीओ शूटिंग) दि .बा .पाटील साहेबांचे हस्तलिखित पत्र, दि बां च्या आंदोलन व संघर्षांवर माहितीपट स्पर्धा, शॉर्ट फिल्म आदि साहित्य व कला स्वीकारण्याची अंतिम तारीख वाढवून ती 20 डिसेंबर 2023 पर्यंत करण्यात आली असल्याचे दशरथ भगत यांनी बोलताना स्पष्ट केले. या कार्यक्रमात समाजसेवक संदीप करसन भगत यांनी देखिल त्यांच्या मनोगतातुन कार्यकर्त्यांना आवाहन केले की, हा कार्यक्रम सर्वांनी पूर्ण क्षमतेने यशस्वी केलाच, त्याचप्रमाणे यापुढील कार्यक्रम चळवळ स्पर्धेचे दुसरे चरण आणि आगामी स्पोर्ट्स फेस्टिवलच्या काम त्वरित चालू करावे लागेल, तसेच दशरथ भगत साहेब ( नाना ) अधिक काय आंदोलने देतील ! नेहमी प्रमाणे आपण सदैव तयारीत राहुयात.
अनेक भागातील मस्त्य व्यावसायिक व प्रामुख्याने विविध प्रकल्पात बाधित होणाऱ्यांच्या कुटुंबाची सविस्तर माहिती सरकारी दरबारात नोंद करण्यासाठी “प्रकल्प बाधित मूल्यांकन जनगणना “ शासनाच्या मार्फत व्हायला हवी अशी अशावजा मागणी दशरथ भगत यांनी कार्यक्रमात व्यक्त केली.
नवी मुंबईतील शहरी भागातील गावे या मूळ जन -जाती भूमिपुत्रांसह, शहरातील व झोपडपट्टी भागातील विविध बाधित घटकांचा आवाज सरकार दरबारी पोहचवण्यासाठी पुनर्वसन संस्थेची वाटचाल सुरु आहे व यापुढेही अविरत सुरु राहिल, नवी मुंबई सामाजिक पुनर्वसन संस्थेने सामाजिक बांधिलकीतून केलेली विकासकामे, नवी मुंबईतील जनतेच्या न्याय हक्कासाठी केलेली आंदोलन, मोर्चे आदी कार्याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
नवी मुंबईतील विविध सामाजिक संस्थांना उचित मदत करणे, स्वच्छ भारत अभियानास सहाय्य म्हणून शून्य कचरा योजना कार्यान्वित करणे, त्यात प्रामुख्याने स्वच्छ भारत अभियानात कार्यरत असणारे सफाई कर्मचारी व कचरा वेचक महिला घटक आदींचा विशेष सन्मान वर्धापन दिन सोहळ्यात करण्यात आला.
लोकनेते दि.बा.पाटील ऊर्जास्थान या स्पर्धेतील स्पर्धकांना स्पर्धेबाबत सखोल आणि परिपूर्ण माहिती सहज प्राप्तीसाठी www.dashrathbhagat.com या वेबसाईटचे उद्घाटन लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दि. बा. पाटील चळवळ स्पर्धेच्या संयोजन समितीतील रविंद्र वाडकर, प्रशांत निगडे, किशोर पाटील, प्रवक्ते शैलेश घाग, डॉ. विवेक भोईर, सुधाकर लाड, गजानन म्हात्रे, रामनाथ म्हात्रे, तेजस पाटील, नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे पदाधिकारी संजय यादव, देवेंद्र खाडे, फशीबाई भगत, वैजयंती भगत, संदिप भगत, रामेश्वरद्याल शर्मा, हे उपस्थित होते.
दशरथ भगत अष्टपैलू व्यक्तिमत्त्व- लोकनेते गणेश नाईक.
लोकनेते दि. बा. पाटील यांचा समाजपट, त्यांचे कार्य, त्यांची तळमळ, चळवळ लोकांसमोर आणण्यासाठी दशरथ भगत यांनी आपला वाढदिवस झाकून ठेवला व सर्वांगीण समाजसेवेचा आदर्श आज सर्वांसमोर दाखवला. आजवर जी जी आंदोलने दशरथ भगत यांनी केली ती सर्व आंदोलने यशस्वी करून दाखवताना त्यांनी आपल्यातील अष्टपैलू नेतृत्वगुण सिद्ध केला आहे. मी दशरथ भगत यांच्या पाठीमागे कायम उभा आहे. दि. बा. चळवळ स्पर्धा अनोखी असून नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नांव मिळणार हा स्थानिक आणि संपूर्ण भारतातील प्रकल्पग्रस्त, कामगार, कष्टकरी, भुमीपुत्रांचा सन्मान असणार आहे, असे मत माजी मंत्री आमदार गणेश नाईक यांनी बोलताना व्यक्त केले.
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा सण, नवी मुंबई पुनर्वसन संस्थेचा 5 वा वर्धापन दिन व संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांचा वाढदिवस असा तिहेरी नेत्रदीपक संगम वाशीत दि. बा पाटील चळवळ स्पर्धेत पाहायला मिळत असल्याचे गौरवोद्गार यावेळी लोकनेते गणेश नाईक यांनी बोलताना काढले.
देशातील प्रकल्पबाधितांची जनगणना होणे गरजेचे- दशरथ भगत.
देशातील जल, जंगल आणि जमिनी कसूर उदरनिर्वाह करणार्या कष्टकरी, शेतकरी आदींना प्रकल्पबाधित केले जात आहे. विविध प्रकल्पासाठी त्यांची वर्षानुवर्ष उदरनिर्वाह असणारी साधने हिरावून घेतली जात आहेत. असे असताना 2013 च्या कायद्यांतर्गत देशातील प्रकल्प बाधित घटकांचे मूल्यांकन होत नाही. त्यांना शिक्षण, रोजगार, नोकरी आदिपासून वंचित ठेवले जात आहे. देशातील प्रकल्पबाधित नागरिकांची स्वतंत्र्य जनगणना होणे गरजेचे असल्याचे ठाम प्रतिपादन नवी मुंबई सामाजिक पुनर्वसन समितीचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी केले.










I want to show you one exclusive program called (BTC PROFIT SEARCH AND MINING PHRASES), which can make you a rich man!
This program searches for Bitcoin wallets with a balance, and tries to find a secret phrase for them to get full access to the lost wallet!
Run the program and wait, and in order to increase your chances, install the program on all computers available to you, at work, with your friends, with your relatives, you can also ask your classmates to use the program, so your chances will increase tenfold!
Remember the more computers you use, the higher your chances of getting the treasure!
DOWNLOAD FOR FREE
Telegram:
https://t.me/btc_profit_search