Press "Enter" to skip to content

खारघरमध्ये उद्या द्वारकादास शामकुमार ‘एक्सक्लूझिव्ह’ महावस्त्रदालनाचा भव्य शुभारंभ !

खारघरमध्ये उद्या द्वारकादास शामकुमार ‘एक्सक्लूझिव्ह’ महावस्त्रदालनाचा भव्य शुभारंभ

‘मैने प्यार किया’ फेम अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार

पनवेल:
साडी खरेदीसाठी महिलांचे अत्यंत आवडते वस्त्रदालन म्हणून ख्याती असणारे ‘द्वारकादास शामकुमार’ हे वस्त्रदालन आता खारघरकरांच्या सेवेसाठी सज्ज झाले असून ‘द्वारकादास शामकुमार एक्सक्लूझिव्ह’ या वातानुकुलीत महावस्त्रदालनाचा भव्य उद्घाटन समारंभ रविवारी (दि. २३ फेब्रुवारी) सकाळी ठीक ११ वाजता शॉप नं. ५५, हावरे टियारा शॉपिंग कॉम्प्लेक्स, सेक्टर १३, खारघर येथे संपन्न होणार आहे. याप्रसंगी ‘मैने प्यार किया’ या लोकप्रिय चित्रपटाची अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
‘द्वारकादास शामकुमार एक्सक्लूझिव्ह’ शोरूमचे उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याहस्ते संपन्न होणार असून याप्रसंगी पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर, बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे, विधानपरिषद आमदार विक्रांत पाटील, हावरे ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन सुरेश हावरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच माजी नगरसेवक प्रविण पाटील, अॅड. श्री. नरेश ठाकूर, अभिमन्यू पाटील, निलेश बावीस्कर, शत्रुघ्न काकडे, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, हर्षदा उपाध्याय, आरती नवघरे, अनिता पाटील, संजना कदम, भाजपा उत्तर रायगड जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
‘द्वारकादास शामकुमार एक्सक्लूझिव्ह’ या वातानुकुलीत महावस्त्रदालनामध्ये ब्रॅन्डेड डिझायनर साडी, डिझायनर घागरा, रेडिमेड ड्रेसेस तसेच पैठणी व सिल्कचा व्हरायटी अनुभवण्यास मिळणार आहेत. त्यामुळे समस्त महिला वर्गामध्ये द्वारकादास शामकुमार एक्सक्लूझिव्ह शोरूमच्या उद्घाटनाची उत्सुकता आहे. तरी याप्रसंगी मान्यवरांसह महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन द्वारकादास शामकुमार ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 7066577000/ 7066587000 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संचालक शरद पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.