पनवेल : श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धा कोण जिंकणार याची महाराष्ट्राला लागलेली उत्सुकता अखेर रविवारी संपली. तीन दिवस चाललेल्या महाअंतिम फेरीत ‘ढ’ मंडळी कुडाळ या संस्थेच्या “बिलिमारो” या एकांकिकाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत एक लाख रुपये आणि मानाचा करंडक असे स्वरूप असलेला प्रथम क्रमांक पटकावून मानाच्या आठव्या अटल करंडकावर आपले नाव कोरले. सर्वोत्कॄष्ठ अभिनेताचा किताब “बिलिमारो” एकांकिकांमधील रंगा, सर्वोत्कॄष्ठ अभिनेत्रीचा किताब हायब्रिड एकांकिकांमधील ज्ञानेश्वरी मंडलिक हिने पटकाविले. तसेच मराठी रंगभूमीला समृद्ध करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश बुद्धीसागर यांना जीवन गौरव स्वरूपात ‘गौरव रंगभूमीचा’ हा पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. ५० हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे स्वरूप पुरस्काराचे होते.
शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितिन चंद्रकांत देसाई, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, महापौर डॉ. कविता चौतमोल, स्पर्धेचे ब्रँड अँबेसिडर ओमकार भोजने, अभिनेते मंगेश कदम, परीक्षक सुप्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते विजय केंकरे, सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, सुप्रसिद्ध लेखक व अभिनेता संजय मोने, सुप्रसिद्ध लेखक डॉ.नितीन आरेकर, सुप्रसिद्ध अभिनेता भरत सावले, हास्य जत्रा फेम शिवाली परब, वनिता खरात, निखिल बने, स्पर्धा सचिव श्यामनाथ पुंडे, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी देशमुख, सुप्रसिद्ध सिने नाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, श्री व सौ नील कोठारी, प्राथमिक फेरीचे परीक्षक अभिजीत झुंजारराव, प्रमोद शेलार, अमोल खेर, स्मिता गांधी, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, रुचिता लोंढे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मयूरेश नेतकर, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, कोकण विभाग सांस्कृतीक प्रकोष्ठच्या सहसंयोजिका अक्षया चितळे उपस्थित होते
यावेळी पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितिन चंद्रकांत देसाई यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि, अटल करंडक स्पर्धेचे हे पारितोषिक महत्वाचे आहे कारण या स्पर्धेतून पुढे आलेल्या कलाकारांनी महत्वाचे योगदान मराठी रंगभूमीला दिलेले पाहायला मिळते. नाटकाच्या एकांकिकेत जो उभा राहतो तो नेहमीच चांगला कलाकार असतो म्हणून मी आजच्या निमित्ताने तुम्हाला आवाहन करतो की महाराणा प्रतापच्या ऑडीशनसाठी तुम्ही या मी सगळ्यांचे स्वागत करतो, असे नितिन चंद्रकांत देसाई यांनी कलाकारांना आवाहन केले. यावेळी त्यांनी स्पर्धेत झालेल्या १०८ एकांकिका पाहण्याची इच्छा ही व्यक्त केली त्यांनी पुढे बोलताना म्हंटले कि, आज मला आनंद होत आहे. कारण ३३ वर्षापूर्वी मी पण तुमच्या जागी होतो. याच तुमच्या पद्धतीने २५ जागांमध्ये निवड होऊन आपल्या पारितोषिक मिळणार का ? याची वाट पाहत होतो. माझ्या आयुष्याचा पहिला सेट मी नाटकाचा लावलेला. तो पण एकांकिका स्पर्धेचा. मी आता ३३ वर्षा नंतर एक महत्वाकांक्षी प्रयोग करतोय. महाराणा प्रताप यांचेवरती मोठी सिरिज करतोय मला असे वाटतेय की एवढे स्पर्धक इथे आलेत त्यांच्यासाठी आपण एन.डी. स्टुडिओत ऑडीशन ठेऊया. स्टेजवर बोलून तुमच्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मला असे वाटते की प्रत्यक्षात काही तरी घडवायला पाहिजे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी एवढे कार्य केले आहे. प्रशांतजी आणि परेशजी एवढं काही करतायत तर माझ्या माध्यमातून ही काही करावे असे वाटते. आपल्या महाराष्ट्रात या रायगड मध्ये भरपूर कलाकार आर्टिस्ट आहेत. फक्त कमी पडतो आत्मविश्वास आणि पुढे जाण्याची जिद्द. चित्रपट सृष्टी दादासाहेब फाळके या मराठी माणसाने उभारली. त्यानंतर करोडोचे त्यामध्ये भांडवल टाकून ही इंडस्ट्री फोफावली. पण आपण थोडेसे कोठे तरी त्यामध्ये मागे असू म्हणून माझा एक खारीचा वाटा आहे. आपण त्यामध्ये कोठे तरी पुढे जावे यासाठी मी माझ्या कार्यक्रमात किवा प्रोजेक्ट मध्ये आपल्या लोकांना स्थान देत असतो आजच्या निमित्ताने मी तुम्हाला आवाहन करतो की महाराणा प्रतापसाठी मी तुमचे सगळ्यांचे ऑडीशनसाथी स्वागत करीत आहे.
समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हंटले कि, लहानपणी आपण कोणते क्षेत्र चमकणार हे माहिती नसते. चांगली दिशा घेतली असेल आणि त्याला घडवण्याचे डायरेक्ट – इन डायरेक्ट प्रयत्न लहानपणी केले तर भावी काळातील एक मोठे व्यक्तिमत्व तयार झालेले आपल्याला दिसते. मी ही असाच एक गरीब मजुरी करणारा मुलगा होतो. पण शिक्षण झाले शिक्षकाची नोकरी लागली. मला मराठी वाड:मयाची आवड होती. साहित्याची गोडी असल्याने नाटक बघायला जाण्याचा मला छंद होता. मी वेळ मिळेल तेव्हा ठाण्याला गडकरी रंगायतन, दादरला शिवाजी मंदिर, रवींद्र नाट्य मंदिर ते विलेपार्ले पर्यंत तेव्हा जात होतो त्यावेळी मी प्रशांत आणि परेशला घेऊन जात असे. त्यावेळी मला माहीत नव्हते पुढे जाऊन ते अशा एकांकिका स्पर्धा भरवतील. आज तुम्ही उभ्या महाराष्ट्रातून आलात. आम्हाला आमच्या आयुष्यात जे जमले नाही ते काम तुम्ही छान पैकी केले, त्याचा मला अभिमान आहे. भावी काळातले तुम्ही चमकते तारे असणार आहात. तुमचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. आपल्यासारखी नाट्यवेडी मंडळी खर्या अर्थाने मराठी संस्कृती जागृत ठेवण्याचे काम करतात. मराठी माणूस ज्या क्षेत्रात जातो तेथे वेडा होतो. राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रात काम करणे आणि कला गाजवणे हा फार मोठा गुण आहे. त्या दृष्टीने तुम्ही फार मोठे कलाकार व्हा. मोठी व्यक्ती व्हा, अशा शब्दात त्यांनी नवोदित कलाकारांना आशिर्वाद दिला.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सांगितले कि, ही स्पर्धा आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून आम्ही २००५ मध्ये मल्हार नाट्य करंडकाच्याद्वारे रायगड जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धा सुरू केली होती. या मध्ये आमचा हेतू अतिशय प्रामाणिक असा होता. येथील कलाकारांना प्रोत्साहन देणे, कलेला उत्तेजन देणे आणि याद्वारे कलेची सेवा करणे. पनवेल क्षेत्रात जास्तीत जास्त नाट्य संस्कृतीचा प्रचार व्हावा यासाठी प्रयत्न करणे या प्रामाणिक हेतूने आम्ही स्पर्धा सुरू केली होती. २०१४ मध्ये आम्ही हि स्पर्धा राज्यातील इतर जिल्ह्यांपर्यंत पोहचण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पनवेल शाखा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार अटल करंडक राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा सुरू केली. तेव्हापासून आम्हाला चांगला प्रतिसाद लाभलेला आहे, कारण या स्पर्धेच्या आयोजनाच्या मागे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा अतिशय मोलाचा सहभाग आहे.

कुडाळच्या “बिलिमारो”ने जिंकले राज्यस्तरीय अटल करंडक !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक ! वनक्षेत्रात आग लावणे किंवा वणवे लावण्याला पूर्णपणे आळा घालणार; कठोर उपाययोजना करणार – वने मंत्री गणेश नाईक !
- मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि ‘रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण’ स्थापन करा!जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
- वलप ग्रामपंचायतीतील २६६० बनावट जन्मनोंदी प्रकरणी ३ आरोपी अटकेत – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती
- मोदींच्या १२ वर्षांत भारताचा सर्वांगीण विकास; पंतप्रधान मोदी देशासाठी वरदान – आमदार संजय केळकर
More from RaigadMore posts in Raigad »







