पनवेल : भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करणाऱ्या आघाडी सरकारच्या कानाखाली सर्वोच्च न्यायालयाने सणसणीत आवाज काढला आहे. यातून आघाडी सरकारने धडा घेऊन आपले बेकायदा वर्तन थांबवावे अशी आक्रमक प्रतिक्रिया भाजपाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान, लोकशाही यांचे नाव उठता बसता घेणाऱ्या शरद पवारांनी आता तरी मुख्यमंत्र्यांना शहाणपणाच्या गोष्टी ऐकवाव्यात. नाहीतर सेनेच्या नावाने राष्ट्रवादीचे गहाणखत करून टाकावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हंटले आहे की, १२ आमदारांच्या निलंबनाचा ठराव कायद्याच्या दृष्टीने दुर्भाग्यपूर्ण, असंविधानिक, बेकायदेशीर आणि कायद्याच्या दृष्टीने कुचकामी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले आहे. हा निकाल देताना न्यायालयाने म्हटलं आहे की,”हा निर्णय हकालपट्टीपेक्षा वाईट आहे. सभागृहात या मतदारसंघाचे प्रतिनिधी नसताना कोणीही प्रतिनिधित्व करू शकत नाही. त्यामुळे ही फक्त सदस्याला शिक्षा होत नाही तर संपूर्ण मतदारसंघाला शिक्षा होते”. आघाडी सरकारने कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळण्याचे ठरविले असल्याने ते एकापाठोपाठ एक बेकायदा निर्णय घेत आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांना बेकायदा बांधकामाबद्दलचा दंड माफ करण्याचा निर्णयही अशाच बेकायदा पद्धतीने घेण्यात आला आहे.
१२ आमदारांच्या निलंबनाचा निर्णय मागे घ्या अशी विनंती भारतीय जनता पार्टीने आघाडी सरकारकडे वारंवार केली होती. मात्र सत्तेच्या गुर्मित असलेल्या मुख्यमंत्र्यांना व त्यांच्या बगलबच्च्यांनी या विनंतीकडे दुर्लक्ष केले. सर्वोच्च न्यायालयाने कानफटवल्या नंतरही सत्ताधाऱ्यांची गुर्मि उतरण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळेच या आमदारांना विधीमंडळात प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील, अशी भाषा भास्कर जाधव यांच्यासारखे नेते करीत आहेत, आणि हे अत्यंत चुकीचे आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले आहे.

आघाडी सरकारने आपले बेकायदा वर्तन थांबवावे- भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
- 5 ऑगस्ट रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पनवेलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य ‘मूट कोर्ट’चा उद्घाटन समारंभ
- लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये “ऋतू हिरवा” अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन !
More from RaigadMore posts in Raigad »







