Press "Enter" to skip to content

स्वच्छ व चरित्र संपन्न आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करून लोकशाही जागृत ठेवा -शिवेंद्रराजे भोसले

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : स्वच्छ चरित्र्याचा माणुस म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांची जनतेत ओळख आहे. हुशार आमदार म्हणून त्यांनी पनवेल, रायगडचा कायापालट केला आहे. तेव्हा तुमच्या विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांना विक्रमी मतानी निवडून आणण्यासाठी २१ आँक्टोबरला कमळ या निशाणीवर मतदान करा आणि माझ्या या मित्राला आणि तुमच्या लाडक्या आमदाराला प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी कळंबोली येथे केली.
महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना एकलाखाच्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी ऱविवारी ( दि. १३ ) कळंबोली येथे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या जंगी सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की स्वच्छ चारित्र्याची माणसे राजकारणात टिकली तर लोकशाही टिकेल आपला देश प्रगतीवर असेल. तेव्हा प्रशांत ठाकूर यांच्या सारखा चरित्र संपन्नवान आणि सर्व सामान्याना सोबत घेवून जाणारा माणूस प्रशांत ठाकूर यांनाच आपण निवडून आणण्यासाठी मी तुम्हाला विनंती करण्यासाठी आलो आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांना तमाम जनता दानशूर म्हणून ओळखत आहे. त्यामुळे त्यांचे उपकार फेडण्याची संधी आपणास प्रशांत ठाकूर यांना भरघोस मतांनी विजयी करून फेडायचे आहे. यावेळी माथाडीचे नेते ऩरेंद्र पाटील यांनी सांगितले की भाजप सरकार जनतेचे सरकार आहे. पनवेलला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी पनवेल मतदार संघातून कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना आपण निवडून देण्याची जबाबदारी पार पडायची आहे.
येथील घरे धोकादायक अवस्थेत आली आहेत त्यांची त्यांचे पुनर्बांधणीचे परवानगी घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मेहनत घेतली आहे. तेव्हा आपण प्रशांत ठाकूर यानाच पुन्हा मोठ्या मताने निवडूण द्या असे आवाहन त्यांनी कळंबोलीकरांना केले.
यावेळी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेकापवर सडकून टिका करताना सांगितले की, यांना सोन्याची अंडी देणारी कोंबडी असणा-या ग्रामपंचायती सोडायच्या नव्हत्या म्हणून यांनी महानगरपालिकेला तीव्र विरोध केला. मला महानगरपालिकेच्या माध्यमातून पनवेलचा विकास करायचा आहे. आणि तो मी करणार आहे. काँग्रेसने अनेक वर्षे सत्ता केली पण गरीबी हटली नाही. आता नरेंद मोदीजींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शहर गावांचा विकास होत आहे महायुतीच्या सरकारने २०१५ पर्यतची बांधकामे नियमित करण्यात येणार आहेत. त्यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे.
यावेळी म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, वर्षा भोसले यांनी कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमासाठी शिवछत्रपती शिवाजी महाराज़ यांंचे १३ वे वंशज श्रीमंत शिवेद्रसिंहराजे भोसले, माथाडीचे नेते ऩरेंद्र पाटील, महाराणा प्रताप राजस्थानचे आमदार जोलारामजी कुमावत, आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष जगदीश गायकवाड, प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे निमंत्रक अतुल पाटील, शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, नगरसेवक संजय भोपी, अमर पाटील, राजेंद्र शर्मा, नगरसेविका विद्या गायकवाड, प्रमिला पाटील, बुधाजी ठाकूर, अशोक मोटे, अतुल पाटील, राजू बनकर, आदीसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »