जागतिक योग दिनानिमित्त प्रबळगड-कलावंतीण सुळका ट्रेक उत्साहात ! आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती; युवकांना दिला निरोगी जीवनशैलीचा संदेश !
पनवेल, प्रतिनिधी : जागतिक योग दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा, उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने रविवारी ‘चलो प्रबळगड-कलावंतीण सुळका ट्रेक’ या विशेष साहसी आणि आरोग्यदायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमात भाजपचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभागी होत युवकांसमवेत योगसाधना केली. योग, साहस आणि निसर्ग यांचा सुंदर संगम साधणाऱ्या या उपक्रमाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रबळगड आणि कलावंतीण सुळका हे रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे स्थळ मानले जातात. या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ट्रेकमध्ये सहभागी युवकांनी पहाटेच्या प्रसन्न वातावरणात ट्रेकचा आनंद घेतला. ट्रेकदरम्यान विविध योगासने आणि प्राणायामाचे सत्र आयोजित करण्यात आले. यामुळे उपस्थितांना शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्याचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी युवकांशी संवाद साधताना सांगितले की, योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. निरोगी शरीर, सुदृढ मन आणि सकारात्मक विचारसरणी घडविण्यासाठी योग अत्यंत उपयुक्त आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात युवकांनी नियमित योगसाधना आणि व्यायामाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. निरोगी आणि सक्षम युवा शक्ती ही विकसित भारताच्या निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक असून, युवकांनी आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित या उपक्रमामागील उद्देश युवकांमध्ये आरोग्य, फिटनेस, पर्यावरण संवर्धन आणि साहसी उपक्रमांविषयी जागरूकता निर्माण करणे हा होता. निसर्गाच्या सानिध्यात केलेल्या योगसाधनेमुळे सहभागी युवकांमध्ये उत्साह, सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या उपक्रमात सरपंच बाळू भूतांबरा, राम भवर, ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील, दिनेश पाटील, भाजप पनवेल शहराध्यक्ष तथा नगरसेवक सुमित झुंझारराव, भाजयुमो उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील, मयूर कदम, हिमेश बहिरा, अनिमेश ओझे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.
जागतिक योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाने युवकांना आरोग्य, शिस्त, साहस आणि निसर्गप्रेम यांचा संदेश देत एक संस्मरणीय अनुभव प्रदान केला.







Really impressed with the rewards here. It feels like they actually care about the players. Highly recommend vnjw88 to anyone looking for a fair game.
Found this site through a friend and I am glad I did. The game variety is huge and the wins are consistent. Much love to vnf1685!