कॉलनी फोरमचे डॉ. सखाराम गारळे यांचा
अनेक कार्यकर्त्यांसह भाजपात जाहीर प्रवेश !
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत !
पनवेल, प्रतिनिधी : कॉलनी फोरमचे कामोठे उपाध्यक्ष डॉ. सखाराम गारळे यांनी त्यांच्या अनेक समर्थक व कार्यकर्त्यांसह आज ( रविवार दिनांक २५ फेब्रुवारी ) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये कामोठे कॉलनी फोरमचे राहुल बुधे , राहुल आग्रे आदी प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पक्षप्रवेश कामोठे येथे संपन्न झाला. यावेळी भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, नगरसेवक विकास घरत, नगरसेवक विजय चिपळेकर, नगरसेवक अरुणकुमार भगत, नगरसेवक अनिल भगत , नगरसेवक नितीन पाटील , भाजप पदाधिकारी अशोक मोटे तसेच इतर अनेक पदाधिकारी व कार्यकार्ये मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी कॉलनी फोरमच्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. कामोठे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप आपणास संपूर्ण ताकद देईल , असा विश्वास यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला आणि भाजपात आलेल्या सर्व सहकाऱ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या . कामोठ्याच्या विकासासाठी आम्ही भाजपात प्रवेश केला आहे. शहराच्या विकासाला गती मिळावी, प्रलंबित नागरी प्रश्न सुटावेत, अशी भावना यावेळी डॉ सखाराम गारळे यांनी व्यक्त केली.






NY Times News Today coverage of international news, politics, business, technology, science, health, arts, sports and more.
https://www.nytimesnewstoday.com/
The login process is super smooth and I rarely encounter any glitches. It makes the whole gaming session much more enjoyable. Highly recommend 17jililogin to everyone.