Press "Enter" to skip to content

डॉ.सखाराम गारळे यांचा कॉलनी फोरम उपाध्यक्ष पदाचा राजीनामा ! भाजप, शिवसेना की राष्ट्रवादीत जाणार ?

डॉ. सखाराम गारळे यांचा कॉलनी फोरम उपाध्यक्ष पदाचा राजीनामा !
भाजप, शिवसेना की राष्ट्रवादीत जाणार ?

पनवेल, प्रतिनिधी : कॉलनी फोरमचे कामोठे उपाध्यक्ष डॉ. सखाराम गारळे यांनी आपल्या पदाचा आज (दि.२३ फेब्रुवारी ) राजीनामा दिला. कामोठे कॉलनी फोरमचे अध्यक्ष मंगेश आढाव यांच्याकडे डॉ सखाराम गारळे यांनी आपला लेखी राजीनामा सुपूर्द केला. कामोठे कॉलनी फोरममधील संघटनात्मक हेवेदावे आणि अंतर्गत वादामुळे आपण राजीनामा देत असल्याचे डॉ सखाराम गारळे यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे. डॉ सखाराम गारळे यांच्या राजीनाम्यामुळे कामोठे कॉलनी फोरमचे संघटनात्मक नुकसान होईल असा प्रथमदर्शनी अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, कॉलनी फोरमच्या राजीनाम्यानंतर डॉ सखाराम गारळे कोणत्या पक्षात जाणार ? भाजप , शिवसेना की राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करतील याबाबत कामोठेकरांमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान , कॉलनी फोरम संघटनेचा पाया खारघर शहरात मजबूत केल्यानंतर कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीनाताई गरड यांनी कामोठे शहरात कॉलनी फोरम संघटना वाढवली. त्यादरम्यान डॉ. सखाराम गारळे यांच्या सारखे उच्चशिक्षित पदाधिकारी मिळाले.डॉ. सखाराम गारळे २०२१ सालापासून कामोठे कॉलनी फोरम संघटनेत सक्रिय झाले. मागील अडीच वर्षात त्यांनी विविध सामाजिक उपक्रम , सार्वजनिक कार्यक्रम राबविले. कामोठे शहरातील विविध नागरी प्रश्नांविरोधात आवाज उठवून सिडको आणि पनवेल महापालिका प्रशासनांचे लक्ष वेधले. डॉ सखाराम गारळे यांच्या झंझावाती कार्यपद्धतीमुळे कामोठे कॉलनी फोरमची ताकद वाढत होती. नुकतीच त्यांच्यावर कामोठे कॉलनी फोरम संघटनेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, डॉ. सखाराम गारळे यांनी अचानक उपाध्यक्ष पदाचा राजनीमा दिला. डॉ गारळे यांचा हा निर्णय कामोठे कॉलनी फोरमसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान , आता डॉ. सखाराम गारळे राजकीय सन्यास घेतील की कोणत्या पक्षात जातील आदी चर्चांना उधाण आले आहे. डॉ गारळे भाजप , एकनाथ शिंदे यांची शिवसेना किव्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, पनवेलचे स्थानिक राजकारण लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सभोवताली फिरत असल्याने डॉ. सखाराम गारळे भाजपात प्रवेश करतील अशी जास्त शक्यता दिसून येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.