तळोजा:- तळोजा पोलिसांकडून आरोपीवर गुन्हा दाखल. कंपनीला आग लागलेली असल्यामुळें बंद आहे तरीपण कामगार दररोज गेट वरती जात असत दिनांक २३,जानेवारीला तळोजा पडघा येथील सुभाष ठाकुर वय -४४ हे कामावर गेले त्या दिवशी मीटिंगचे आयोजन असल्यामुळें कंपनीच्या आत गेले होते, परंतु तिथे पडघे चे माजी सरपंच जनार्धन भोईर यांचा गुंड प्रवृत्तीच्या मुलगा विनोद भोईर हा इतरांना शिव्या देत होता त्या देऊ नये म्हणून सुभाष ठाकुर यांनी संगितले त्या गोष्टीचा राग येऊन सुभाष ठाकुर यांना लाकडी काठीने मारहाण करत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला ते गंभीर जखमी झाले असून श्री साई मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल तळोजा (MIDC)येथे उपचाराठी दाखल केलेले आहे. पोलिसांनी सदर जीवघेना हल्ल्याची दखल घेतली असून परंतु घटनेच्या जीवघेणा हल्ला कलम न लावता साधारण कलम लावले असून रुग्ण हॉस्पीटल मध्ये व आरोपी अजूनही मोकाट आहे कलम अन्वये गुन्हा दाखल केला असून फिर्यादीच्या कुटुंबाला ३२४, ५०४ हे सौम्य कलम मान्य नाही कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करावा अशी पोलिसांना कुटुंबाने विनंती केली आहे पुढील तपास पोलिस करत आहेत
शिवीगाळ करु नको याचा राग धरत आरोपीने केली काठीने मारहाण.
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
- 5 ऑगस्ट रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पनवेलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य ‘मूट कोर्ट’चा उद्घाटन समारंभ
- लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये “ऋतू हिरवा” अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन !





Be First to Comment