Press "Enter" to skip to content

जागृत फांऊंंडेशनचा हास्य कवि सम्मेलन आणि होळी मिलन कार्यक्रम उत्साहात साजरा !

जागृत फांऊंंडेशनचा हास्य कवि सम्मेलन आणि होळी मिलन कार्यक्रम उत्साहात साजरा

शनिवार दि. 11 मार्च रोजी जागृत फांऊंंडेशन, नवी मुंबई संस्थेच्या वतीने होळी सणानिमित्त हास्य कवि सम्मेलन आणि होळी मिलन कार्यक्रमचे आयोजन खारघर येथे करण्यात आले होते.
श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान चे अध्यक्ष स्वामी श्री कंठानंद जी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामीजींचे आशीर्वचन संबोधन झाले व त्यानंतर अरविंद राही, मनोज दुबे, शेखर अस्तित्व, राज बुंदेली, योगेश मिश्र, ओमप्रकाश तिवारी, बसंत आर्य, प्रमिला शर्मा या सुप्रसिद्ध कवींनी त्यांच्या रचना प्रस्तुत करून उपस्थित हजारो श्रोत्यांचे मनोरंजन केले.
कार्यक्रमाला भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, ईश्वरभाई पटेल, प्रमोद चौधरी, समीर अग्रवाल, राम खरपुरिया, ब्रिजेश पटेल, बीना गोगरी, नेत्रा पाटील, अनिता पाटील, संतोष शर्मा, इत्यादि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवीन खरे यांनी केले. जागृत फांऊंंडेशन संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खरपुरिया, सचीव शिवमकुमार सिंह, कोषाध्यक्ष भावेश अंकोलिया, जयेश गोगरी, रंजन शर्मा, राजेश सिंह, ललित चौधरी, चन्द्रभान सिंह, विपुल अग्रवाल यांच्या प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »