विविध समाजोपयोगी कार्यक्रमाद्वारे लोकनेते दि बा पाटील यांना नवी मुंबईत अभिवादन !
नवी मुंबई : लोकनेते दि बा पाटील यांच्या ९७ व्या जयंती निमित्त नवी मुंबई महापालिका क्षेत्रात शहर विकासात योगदान देणाऱ्या नवी मुंबईतील लोकनेते स्व.दि बा.पाटील भूमिपुत्र ठेकेदार संघटनेच्या वतीने नेरूळ सेक्टर १४ येथील कुकशेत मधील वेलकम हॉल याठिकाणी विनम्र अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये दि बां च्या कार्यांस अभिप्रेत अश्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दि. बां च्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन केल्यानंतर, सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर, समाज प्रबोधन पर आगरी-कोळी समाजातील प्रबोधनकार संजीवन म्हात्रे व राजाराम पाटील यांचे मार्गदर्शन शिबिर आणि प्रकल्पग्रस्तांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेच्या ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या केंद्राचा शुभारंभ असे उपक्रम राबविण्यात आले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी महापौर सागर नाईक, जयवंत सुतार, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, युवा नेते वैभव नाईक, प्रकल्पग्रस्त नेते डॉ राजेश पाटील, माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे, माजी परिवहन सभापती दिलीप म्हात्रे, माजी शिक्षण समिती सदस्य वासुदेव पाटील, नवी मुंबई ठेकेदार वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष जेकब रेनिल यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी लोकनेते स्व. दि. बा.पाटील भूमिपुत्र ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष जितेश म्हात्रे, उपाध्यक्ष अनिकेत पाटील, सचिव गौरव म्हात्रे, खजिनदार प्रशांत भोईर, अमित मढवी, सुदर्शन डोंगरे, भावेश पाटील तसेच शेकडो स्थानिक भूमिपुत्र ठेकेदार बांधव उपस्थित होते.
शहर विकासात योगदानकर्ता म्हणून भूमिपुत्र आणि स्थानिक ठेकेदारांसह इतर घटकांचेही अस्तित्व व हक्क सुरक्षित राहण्यासाठी नवी मुंबईतील स्थानिक व भूमिपुत्र ठेकेदारांनी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह आयोजित केलेल्या ठेकेदारांच्या मेळाव्यास लोकनेते आमदार गणेशजी नाईक साहेब यांनी उपस्थिती लावून सर्व ठेकेदारांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे व वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून नागरिकांच्या कराच्या रूपाने जमा झालेल्या निधीचा नाश करणाऱ्या बाबूशाही प्रवृत्तीच्या विरोधात आंदोलन देखील करण्यास मागेपुढे पाहणार नाही असा गंभीर इशारा दिला होता.
सन २०१६ पासून सातत्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या नागरी सेवा, विकास प्रगती, विकासाला चालना व दर्जा या बाबी घसरलेल्या आहेत ज्याअर्थी प्रशासकीय यंत्रणेत दुरुस्ती करुन शहराची प्रतिष्ठा क़ायम राखावी अशी आर्जव विनंती नवी स्थानिक व भूमिपुत्र ठेकेदार असोसिएशनने याच मेळाव्यात सन्मा.नाईक साहेब यांच्याकडे केली होती,
ज्याचा सकारात्मक परिणाम त्यानंतर पालिकेच्या कामकाजात होऊन, अधिकाऱ्यांच्या ठेकेदारांना योग्य भूमिकेतून घेतले जात आहेत, मात्र अद्यापही ठेकेदारांचे काही प्रश्न हे प्रलंबित आहेत जे प्रशासकीय व राजकीय स्तरावर सुटतील अशी आशा आज दि बां च्या जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात ठेकेदारांनी व्यक्त केली. जर या समस्या सुटल्या नाहीत तर भूमिपुत्र ठेकेदार हे लोकनेते दि.बा. पाटील साहेबांच्या प्रेरणेने संघटीत होऊन संघर्ष करतील असा सूर देखील यावेळी व्यक्त करण्यात आला.
दि.बा पाटील साहेबांच्या जयंती निमित्ताने संघटनेने एकत्रित येऊन घेतलेल्या मार्गदर्शन सभेत ठेकेदारांप्रती असलेल्या समस्यांवर चर्चा झाली ज्यामध्ये प्रामुख्याने
महापालिकेच्या विकास कामांच्या जीवघेण्या निविदा स्पर्धेत उच्चतम कमी दराने कामे केली जातात ज्यामुळे पालिकेचा आर्थिक नुकसान होतो याउलट फक्त अधिकाऱ्यांचाच वारंवार आर्थिक लाभ होतो हे थांबले पाहिजे, विविध विभागातील भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठीच ५० लाखांपर्यंतची सर्व कामे मिळाली पाहिजेत, भूमिपुत्र आणि स्थानिक ठेकेदारांची अडवणूक आणि बेदखल करण्यासाठीची टाकण्यात आलेली १० कोटी रुपये पर्यंत कामांसाठी आर. एम. सी. व डांबर प्लांटची (मालकी हक्क) रद्द केली पाहिजे, शेड्युल बी प्रमाणे लादलेली विविध साहित्यांसाठी कारखानाच असावा हि अट अनावश्यक बुद्धीला आणि तर्का सहित आधुनिकतेला न पटणारी अट रद्द करावी, स्वच्छ भारत अभियानाच्या यशात ठेकेदारांचा देखील मानसन्मान करावा, शासन निर्णया नुसार १० लाखांच्या निविदा ऑफलाइन करण्याचा GR निघालेला असून सुद्धा तो लागू केला जात नाही तो लागू करावा, तसेच सदरच्या निविदा भूमिपुत्र व ठेकेदारांचे पुनर्वसन म्हणून देण्यात याव्या, गार्डन विभागसह अन्य विभागातील गतिमान नागरी सेवेसाठी ठेकेदारांना त्यांच्या बिल प्राप्तीसाठी त्रासदायक न ठेवता सदर प्रक्रिया विना विलंब जलद करावी, गार्डन विभागातील कामांसाठी २०२२-२३ ची दरसूची लागू करावी, दाट वस्तीतील मूळ गावे तसेच झोपडपट्टी भागातील विकास कामांचा अधिक खर्च लक्षात घेऊन दरसूची त्याप्रमाणे वेगळ्या हेड निहाय करावी, महापालिकेने दर ६ महिन्यांनी ठेकेदारांना आधुनिक तंत्रज्ञान आणि शासनाचे विविध निर्णय बाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण द्यावे, पालिका क्षेत्रा बाहेरील ठेकेदारांनी निविदेसोबत जोडण्यात आलेले तांत्रिक व अनुभव दस्तावेज प्रत्यक्ष संबंधित केलेल्या विभागात तपासणी केल्याशिवाय दर निविदा ओपन करू नये, भूमिपुत्र व स्थानिक ठेकेदारांचे अस्थित्व आणि प्रबळ स्पर्धेत तसेच मोठ्या विकास कामात संधी मिळण्यासाठी व बेदखल न होण्यासाठी जॉईंट व्हेन्चरची (JV) अधिनियमाची तरतुद करावी, स्वच्छ भारत अभियान स्पर्धेची व इतर स्पर्धा मधील बक्षीसे घेतल्या नंतर तरी विलंबित प्रस्ताव त्वरित तयार करून बिले देण्यात यावीत, आपत्कालीन व्यतिरिक्त, स्वच्छ भारत अभियान सहित विविध विकास कामे विना टेंडर करून नयेत, स्वच्छ भारत अभियानाची कमी निविदा प्रक्रिया अगोदर केली जातात. परंतु सदरचे प्रस्ताव न तयार करता केलेल्या कामावर तसेच इतर कामांवरही लाल शाईचा दबाव टाकून, अनेक महिने सतत स्वखर्चाने ठेकेदारांकडून करून घेतात हि पिळवणूक त्वरित बंद व्हावी, शहर सेवा आणि विकासाला गती देण्यासाठी २५ लाखाच्या खालील कामांचे प्रस्ताव आणि बिल देयक हे कार्यकारी अभियंता यंत्रणेच्या स्थरावर प्रक्रिया व्हावी, विकास कामांची निविदा झाल्यानंतर कमीत कमी दीड महिन्यापर्यंत कार्यादेश आणि संबधित दस्ताऐवजाची पूर्तता व्हावी,
शहर सेवा आणि विकासाला गती तसेच नवनवीन उपाय योजना करण्यासाठी व साटेलोटे बंद करण्यासाठी नियमानुसार संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या करणे हे बंधनकारक आहे, त्याबाबत संबंधित प्रशासकीय स्तरावर त्वरित कार्यवाही व्हावी या व अश्या काही प्रलंबित प्रश्नांबाबत लोकनेते स्व. दि.बा.पाटील भूमिपुत्र ठेकेदार संघटना आग्रही राहील असे संघटनेचे अध्यक्ष जितेश म्हात्रे यांनी म्हटले.





