Press "Enter" to skip to content

नवी मुंबईत महाप्रबोधन यात्रा उत्साहात गद्दारांना चोरी शिवाय काहीच येत नाही : शिवसेना नेते अरविंद सावंत यांचे फटकारे !

नवी मुंबईत महाप्रबोधन यात्रा उत्साहात
गद्दारांना चोरी शिवाय काहीच येत नाही
शिवसेना नेते अरविंद सावंत यांचे फटकारे
विष्णुदास भावे नाट्यगृहात रेकॉर्ड ब्रेक गर्दी


नवी मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी) – शिवसेना आणि मातोश्रीशी दगाफटका करून सत्तेत बसलेल्या गद्दारांना चोरी शिवाय काहीच येत नाही. धनुष्यबाण गोठवल्यानंतर शिवसेनेच्या वतीने मागणी करण्यात आलेल्या तीन चिन्हांपैकी दोन चिन्हांची चोरी गद्दारांनी केली. शिवसेनेने मागणी केलेली चिन्ह निवडणूक आयोगाने गुपीत ठेवणे आवश्यक होते. मात्र गोंधळ वााढवण्यासाठी ती उघड करण्यात आली. जे गद्दार धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा सांगत आहेत. त्यांची धर्मवीरांचे नाव घेण्याचीही लायकी नाही. धर्मवीरांकडे निष्ठा होती, यांच्याकडे फक्त विश्वासघात आहे, असे फटकारे शिवसेना नेते, खासदार अरिवंद सावंत  यांनी मिंधे गटाला आज नवी मुंबई लगावले.
शिवसेना प्रबोधन यात्रेनिमित्ताने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आज शिवसैनिकांचा मोळावा पार पडला. या मेळाव्याला नवी मुंबईकरांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती. हजारो नागरिक मेळाव्याला आल्यामुळे आसन व्यवस्था आपुरी पडल्याने शेकडो नागरिक खाली पायNयांवर आणि व्यासपिठा समोरील मोकळ्या जागेत बसले. नाट्यगृहाच्या बाहेर लावलेल्या स्क्रीनसमोरही मोठी गर्दी झाली होती. या मेळाव्याला संबोधित करताना शिवसेना नेते अरविंद सावंत म्हणाले की, गद्दार उठसूठ पक्षप्रमुखांवर आरोप करीत आहेत. मात्र त्यांनी हे लक्षात ठेवावे पक्षप्रमुखांनी संयम राखला आहे, म्हणून महाराष्ट्र शांत आहे. नाहीतर तुमची पळताभुई थोडी झाली असती. भाजप आणि मिंधे गटाने लोकशाहीचा गळा घोटला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला अडचणीत आणण्यासाठी अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण केले जात आहे. मात्र न्यायदेवतेने आता या खोडसळपणाला जोरदार चफराक मारली आहे. मिंधे गटाच्या इशाNयावर नाचून मुंबई महापालिका प्रशासनाने आपल्या माथ्यावर सर्वात मोठा कलंक लावून घेतला आहे, अशी टिका यावेळी अरविंद सावंत यांनी केली.
या प्रसंगी शिवसेना उपनेत्या सुषमा आंधारे, खासदार राजन विचारे, ठाणे लोकसभा संपर्वâप्रमुख मधुकर देशमुख, नवी मुंबई संपर्वâप्रमुख आप्पा पराडकर, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, युवासेना सहसचिव करण मढवी, जिल्हा युवती अधिकारी पूनम आगवणे, चेतन नाईक, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, प्रकाश पाटील, अतुल कुळकर्णी, मिलिंद सुर्यराव, दिलीप घोडेकर, संतोष घोसाळकर, शहरप्रमुख विजय माने, प्रवीण म्हात्रे, उपजिल्हा संघटक विनया मढवी, आरती शिंदे, उषा रेनके, शशिकला पराजुली, रंजना खैरनार, वैशाली घोरपडे, वसुधा सावंत, आशालता गोंधळी, भारती कोळी, कोमल वास्कर,  काशिनाथ पवार, रंगनाथ औटी, जितेंद्र कांबळे, रवींद्र म्हात्रे, आत्माराम सणस, विजयानंद माने, डी. आर. पाटील, सतिश रामाणे, उषा भोईर, वैशाली माने, समीर बागवान, एकनाथ दुखंडे, आदी उपस्थित होते.

शिवसेनेसाठी शहीद झाले तरी बेहत्तर
संकटात असलेली लोकशाही वाचवण्यासाठी महाप्रबोधन यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेच्या शुभारंभासाठी ठाणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात विचार व्यक्त केले म्हणून माझ्यासह अन्य पदाधिकाNयांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्याला मी घाबरले नाही. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मला अप्रत्यक्ष धमक्या दिल्या जात आहेत. माझ्या जिवाला धोका आहे, असे पोलिसांकडून मला सांगण्यात आले आहे. या धमक्यांना मी घाबरणार नाही. शिवसेनेसाठी शहीद झाले तरी आता मागे हटणार नाही. माझी पाच वर्षांची लेक मी शिवसेनारुपी कुटूंबाच्या स्वाधिन केली आहे. मी जरी गेले तरी माझे हे सर्व भाऊ तिला मामाच्या मायेने वाढवणार आहेत, असा विश्वास यावेळी शिवसेना उपनेत्या सुषमा आंधारे यांनी व्यक्त करून गद्दारांचा जोरदार समाचार घेतला.
हिंमत असेल तर समोरासमोर लढा
मातोश्रीच्या निष्ठावंत शिवसैनिकांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यानंतरही ते ऐकत नसतील तर पोलिसांना हाताशी धरून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. मात्र गद्दारांनी हे लक्षात ठेवावे किती अन्याय केला तरी शिवसैनिक वाकणार नाही. तो अन्यायाच्या विरोधात पेटून उठणार आहे. गद्दारांमध्ये हिंमत असले तर त्यांनी समोरासमोर येऊन लढावे. त्रास देण्यासाठी शासकीय यंत्रणांच्या कुबड्या घेंऊ नये, असा घणाघात खासदार राजन विचारे यांनी यावेळी मिंधे गटावर केला.   

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »