शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा १३ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत !
विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडणार भव्य मेळावा !
नवी मुंंबई, दि. १२ (प्रतिनिधी) – शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा उद्या नवी मुंबईत येणार असून सायंकाळी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात शिवसैनिकांचा भव्य मोळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, खासदार राजन विचारे आणि शिवसेना उपनेत्या सुषमा आंधारे यांच्या तोफा धडणार आहेत. ठाणे शहरात महाप्रबोधन यात्रेचा शुभारंभ होऊन तीन दिवस उलटल्यानंतर लगेच नवी मुंबईत शिवसैनिकांचा मोळावा पार पडत असल्याने मिंधे गट आणि भाजपवाल्यांच्या पायाखालील वाळू सकरली आहे. या मेळाव्यात शिवसेना नेते सत्ताधाNयांचे आणि गद्दारांचे काय वस्त्रहरण करणार याकडे संपूर्ण नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेचा महाप्रबोधन यात्रा मेळावा वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात उद्या सायंकाळी चार वाजता सुरू होणार आहे. नवी मुंबईतील हजारो शिवसैनिक या मेळाव्यासाठी येणार आहेत. या प्रसंगी प्रमुख वक्त्यांसह ठाणे लोकसभा क्षेत्र संपर्वâप्रमुख सुधाकर देशमुख, नवी मुंबई संपर्वâप्रमुख आप्पा पराडकर आदी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व तयारी नवी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी वाशी येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. या प्रसंगी जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, प्रकाश पाटील, शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे, उपशहरप्रमुख नरेश चाळके, विभागप्रमुख विजय चांदोरकर, उपविभागप्रमुख संदीप पवार आदी उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांनी वाशी शाखेत मशाल पेटवून गद्दारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पद जाऊ द्या, सर्व सैरावैरा धावतील
नवी मुंबई शिवसेनेत जे बाहेरून आले होते, ते गद्दारांच्या कळपात गेले आहेत. निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीच्या मागे खंबीरपणे उभा आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री पद आहे, तोपर्यंतच ते तिकडे आहेत. एकदा पद जाऊ द्या, जे गेलेत ते सर्व सैरावैरा धावताना दिसणार आहेत, अशी प्रतिक्रिया यावेळी जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांनी व्यक्त केली.
जाणाराला निमित्त लागते
मिंधे गटात जाणाNया प्रत्येकाला काहीना काही निमित्त लागत आहे. तसेच निमित्त विजय नाहटा यांनी शोधून काढले आहे. पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना ते भेटत नव्हते, असा कांगावा त्यांनी काल केला. त्यात काहीच तथ्य नाही. पक्षप्रमुख भेटले नसते तर त्यांना उपनेतेपद आणि दोन दोन महामंडळे भेटली असती का असा प्रश्न जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी उपस्थित करून मिंधे गटाचे सर्व आरोप खोडून काढले.





