Press "Enter" to skip to content

पाचवली गावाचा विकास कधी होणार ? ग्रामस्थांनी घेतली खासदार सुनील तटकरे यांची भेट !

पाचवली गावाचा विकास कधी होणार ?
ग्रामस्थांनी घेतली खासदार सुनील तटकरे यांची भेट !

दापोली : दापोली तालुक्यातील पाचवली बौद्धवाडीतील विकास मागील अनेक वर्षांपासून रखडला आहे. रस्ते आणि दिवाबत्तीसारखी साधी कामे होताना वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत आहे. बौद्धवाडीतील विकास स्थानिक राजकारणात अडकला आहे. पक्षीय राजकारणात विकासाचा देखील खोळंबा होत आहे. मागील 50 वर्षांपासून जाणीवपूर्वक विकास योजना रखवडल्या जात आहेत. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन देखील ढिम्मपणे पाहत आहे. अखेर विकासाची प्रतिक्षा किती वर्षे करायची असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, पाचवली बौध्दवाडी विकासकामासंर्दभात खासदार सुनील तटकरे यांची संस्थेचे अध्यक्ष दिपक महाडिक व सचिव सुभाष महाडिक यांनी श्रीवर्धन या ठिकाणी भेट घेतली. पाचवली गाव आणि विशेषतःवाने पाचवली बौद्धवाडीतील नागरी प्रश्नांकडे कसे दुर्लक्ष होतंय याबाबत चर्चा केली. याबाबत सकारात्मक आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी दिले.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »