Press "Enter" to skip to content

खारघर रेल्वे स्थानक ते बेलपाडा गाव यांना जोडणाऱ्या भुयारी मार्गाची दुरुस्ती करावी : भाजपची मागणी !

खारघर रेल्वे स्थानक ते बेलपाडा गाव यांना जोडणार्‍या भुयारी मार्गाची दुरुस्ती करावी : भाजपची मागणी !

पनवेल : खारघर रेल्वे स्थानकातून बेलपाडा गाव,तसेच खारघर मधिल से.५,६,उत्सव चाैक मार्गे से.२१ व टाटा कँन्सर हाँस्पिटल व पुढे तलोजा कडे जाणारी वहाणे याच अंडरपासचा वापर करीत असतात.पावसाळ्यात सदर मार्ग हा गेली अनेक वर्षे नेहमीच त्याच्या दुरावस्थेमुळे चर्चेत असतो.
दरवर्षी येथे पाणी साचते व रस्त्त्यात मोठमोठे खड्डे पडून पाणी भरते.नेहमी प्रमाणे सिडको थातुरमाथुर मलमपट्टी करते पण ठोस उपाय करित नाहि.पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज न आल्याने येथे नेहमीच छोटे मोठे अपघात होत असतात.प्रचंड प्रमाणात वहातुक कोंडी होते.सिडकोचे सर्व अधिकारी हे सारे जाणतात पण कायमस्वरुपी उपाय योजना करीत नसल्याने दर पावसाळ्यात हा मार्ग मृत्युचा सापळा बनून राहिला आहे.
सदर मार्गासाठी कायम स्वरुपी उपाय करुन जनतेला होणार्‍या त्रासापासून मुक्त करा या साठी आज सिडको कार्यकारी अभियंता श्री रघुवंशी यांना भाजपा खारघर मंडल चे अध्यक्ष श्री ब्रिजेश पटेल व प्रभाग क्रमांक :05 चे माजी नगरसेवक श्री शत्रुघ्न काकड़े ने आवेदन दिले। या वेला भाजपाचे कार्यकर्ता विपुल चोटलिया, कृष्णा खड़गी उपस्थित होते

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »