पनवेल : बेस्टतर्फे वाशी ते मुंबई विमानतळ यादरम्यान २४ तास वातानुकूल AS-881या क्रमांकाची बससेवा चालू करण्यात आली आहे. वाशीहून व विमानतळावरुन दर तासाला या बसेस सुटत आहेत.T1 व T2 दोन्हि टर्मिनल्स येथे वाद्रे कुर्ला संकुलामार्गे जाणार्या या बसेसना साधारण १तास१५ मि.चा वेळ लागतो.यासाठि प्रवास शुल्क रु.१५० इतकेच असून सामानाचे शुल्क आकारण्यात येत नाहि.हि बससेवा नवी मुंबईतून मुंबई विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना अतिशय सोयीची असून उबेर,ओला,टँक्सी सारख्या महागड्या सेवांपेक्षा किती तरी पटीने स्वस्त व किफायतशीर आहे.
भारतीय जनता पार्टी खारघर तळोजा मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री ब्रिजेश पटेल यांनी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर माननीय सौ कविता चौतमोल यांना खारघरवासियांच्यावतिने एका निवेदनाव्दारे मागणी केली आहे की सदर सेवा खारघरपर्यंत विस्तारित केल्यास खारघरच्या रहिवाशांसहित बेलापूर नेरुळ जुईनगर सानपाडा येथील प्रवाशांना सदर बससेवेचा लाभ घेता येणे शक्य होणार आहे.
या बससेवेची उपयुक्तता ध्यानात घेवून सदर सेवेचा लाभ पनवेल महानगर परिसरातील प्रवाश्यांनाहि व्हावा यासाठि सेवा खारघर शहरा पर्यंत विस्तारित करावी अश्या आशयाचे मागणीचे पत्र महापौर सौ.कविता चाैतमोल यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पाठविले आहे.

खारघर ते मुंबई विमानतळादरम्यान बस सेवा सुरु करावी : खारघर भाजपची मागणी !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




